घरगुती सिलिंडरमधून गॅसची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:38 AM2019-03-21T00:38:48+5:302019-03-21T00:39:25+5:30

ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडर पोहोच करणाऱ्या चंद्रकांत गॅस एजन्सी या भारत गॅस वितरकाकडे नोकरीस असलेल्या दोघा कामगारांना मखमलाबाद शिवारात गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.

Gas stolen from domestic cylinders | घरगुती सिलिंडरमधून गॅसची चोरी

घरगुती सिलिंडरमधून गॅसची चोरी

Next

पंचवटी : ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडर पोहोच करणाऱ्या चंद्रकांत गॅस एजन्सी या भारत गॅस वितरकाकडे नोकरीस असलेल्या दोघा कामगारांना मखमलाबाद शिवारात गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी करताना पोलिसांना ते आढळून आले. त्यांच्याकडून एकूण तीस सिलिंडरसह रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गॅस सिलिंडर वितरकाकडे काम करणारे डिलिव्हरीबॉय ग्राहकांना सिलिंडर घरपोहोच करण्यापूर्वी त्यामधून गॅस चोरी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर, प्रवीण कोकाटे, संजय मुळक, शांताराम महाले, विशाल देवरे, चव्हाण आदींनी मखमलाबाद शिवारातील विद्यानगरजवळ सापळा रचला. यावेळी ओमनगर परिसरात रस्त्याच्या कडेला एक रिक्षा (एमएच १५, एजी ९८४६) संशयास्पदरीत्या उभी करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी रिक्षाजवळ धाव घेत पाहणी केली असता संशयित आरोपी प्रभू प्रकाश अवसारमोल (रा. वाघाडी), अनिल केशव घोडे (रा. गंजमाळ, भीमवाडी) हे दोघे कामगार एजन्सीमधून घेऊन निघालेल्या भरलेल्या गॅस सिलिंडरमधून यंत्राच्या सहाय्याने गॅसची चोरी करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-१ करीत आहे.
घरगुती वापराचे दोन रिकामे सिलिंडरसह भरलेले २६ आणि १ व्यावसायिक वापराचे मिळून ३० सिलिंडरसह वाहन जप्त करण्यात आले आहे. भरलेल्या सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅसचा भरणा करत चोरी केल्याचीकबुली संशयितांनी पोलिसांकडे दिली आहे.

Web Title: Gas stolen from domestic cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.