हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गावाने साजरे केले गेट टुगेदर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 06:03 PM2019-05-12T18:03:07+5:302019-05-12T18:03:40+5:30

येवला : दरवर्षी हरिनाम सप्ताह ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात साजरा करण्यात येतो. या सप्ताहात हरिनामासोबतच इतरही सामाजिक उपक्र म राबविले तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होऊ शकतो याचे उदाहरण तालुक्यातील विखरणी येथील ग्रामस्थांनी घालून दिले आहे.

 Gate togather celebrated on the occasion of HariNaam Week! | हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गावाने साजरे केले गेट टुगेदर !

हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गावाने साजरे केले गेट टुगेदर !

Next

सालाबादप्रमाणे आठवडाभर हरिनामाचा गजर होतोच शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप होते. महाप्रसादही स्पाहस्थळीच तयार केला जातो. मात्र यावर्षी या परंपरेला फाटा देत प्रत्येक कुटुंबातील महिलांनी महाप्रसादासाठी घरूनच मांडे करून आणावेत व सोबतच आपल्या लग्न झालेल्या मुलींना व नोकरी व्यवसायानिमित्त परगावी गेलेल्या मुलांना या सप्ताहासाठी आमंत्रित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. महिलांसह गावकऱ्यांनीही या आवाहनाला प्रतिसाद देत महाप्रसादासाठी प्रत्येक घरातून ५ ते ७ मांडे करून आणले. आपण केलेले मांडे आपणच घेऊन जावेत आणि सर्वांसोबत महाप्रसाद घ्यावा. या भावनेतून महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सोबतच अनेक माहेरवाशीनींनी या हरिनाम सप्ताहाला हजेरी लावत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. वर्गमैत्रिणी असलेल्या महिलांना एकमेकींना भेटल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. आपल्या लेकींच्या चेहºयावरील आनंद पाहून आई-वडिलांनाही आयोजकांचे आभार कसे मानावेत हेच कळत नव्हते. महाप्रसादाचा कार्यक्र म पार पडल्यानंतर सासुरवाशीणींच्या हस्ते माहेरवाशीणींच्या हळदी कुंकवाचा कार्यक्र म उत्साहात पार पडला. आयोजकांच्या वतीने माहेरची भेट म्हणून सर्व महिलांना ब्लाउज पीस दिले व पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देण्यात आले. सप्ताह कालावधीत अनेक प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली होती. पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांच्या कल्पनेतून या कार्यक्र माची आखणी करण्यात आली होती. रंगनाथ ठोंबरे, श्रावण महाराज वाघमोडे, सोपान पगार, परशराम गोडसे, सुखदेव शेलार, परशराम शेलार, सुगंदेव रोठे या जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यमाजी शेलार, अशोक कोताडे, अरु ण ठोंबरे यांच्यासह तरु णांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

Web Title:  Gate togather celebrated on the occasion of HariNaam Week!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.