गुरुमाउलींच्या सेवाकार्याचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:05 AM2019-06-10T01:05:27+5:302019-06-10T01:08:56+5:30
त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग व श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या माध्यमातून गुरुमाउली अण्णासाहेब मोरे करीत असलेले सेवाकार्य समाज व राष्ट्रहिताचे असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

एका लग्नसमारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री त्र्यंबकेश्वरी आले असता त्यांनी गुरुपीठ परिसरात सुरु असलेल्या विविध उपक्र म व विभागांना भेट दिली. आज श्री गुरु पीठ भेटीत गुरुमाऊलींचे सेवाकार्य कार्य जवळून अनुभवण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो , अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी मुख्यमंत्री यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, भारती पवार, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेषत: येथील सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचे जे सेवा कार्य सुरु आहे त्याची मुख्यमंत्र्यांनी बारीक सारीक माहिती घेतली.
तद्नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांसह येथील चारही शक्तीपीठे तसेच कालभैरवनाथ महाराज व पंचमुखी हनुमानाचे पूजा करुन त्यांचे आशीर्वाद घेतले.या प्रसंगी अण्णासाहेब मोरे, श्री गुरु पीठाचे व्यवस्थापक चंद्रकांत मोरे यांनी गुरु पीठातील कार्याची माहिती दिली. यावेळी सेवेकरीदेखील उपस्थित होते.