नाशिक : रम्य सायंकाळ, आल्हाददायक गारवा, सादर होत असलेली एकापेक्षा एक सुमधुर गाणी, तितक्याच दमाची स्वरसाथ या भारावून टाकणाऱ्या वातावरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते संगीत रजनी व दुग्धपान कार्यक्र माचे. मंगळवारी (दि.२३) भद्रकालीतील साक्षी गणपती मंदिराच्या प्रांगणात ही मैफल रंगली. यावेळी प्रसिद्ध गायक अविराज तायडे, ज्ञानेश्वर कासार, आशिष रानडे यांनी ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘जोगवा’, ‘चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद हैं’, ‘बाजे रे मुरलीया बाजे रे’, ‘घेई छंद मकरंद ’ आदी विविध गाणी सादर केली. त्यांना नितीन पवार (तबला), दिगंबर सोनवणे (पखवाज), अमित भालेराव (साईड ºिहदम), श्रेयस जानोरकर, दिव्या रानडे (हार्मोनियम), पार्थ शर्मा (गिटार), शरायू गुप्ता, ओमकार कडवे (तानपुरा), रामा नवले (ध्वनी व विद्युत सहाय्य) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमास रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
साक्षी गणपती मंदिराच्या प्रांगणात गीतांची मैफल रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:30 AM