मनमाड : रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या विकास कामांच्या पाहणी करण्या साठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मनमाड येथे भेट दिली. विशेष कोच मध्ये आलेले महाव्यवस्थापक तब्बल तास भर बाहेर न आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताटकळत प्रतीक्षा करावी लागली.मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर संजीव मित्तल येणार म्हणून मनमाड रेल्वे स्थानक चकाचक दिसत होते. एरवी घाणीचे साम्राज्य, भिंतीवर पिचकाऱ्याचे चित्र, भिकाऱ्यांचा ठिय्या दिसून येतो. मात्र रेल्वेचे महाव्यवस्थापक येणार असल्याने स्टेशन चकाचक झाले होते.मित्तल रविवारी (दि. सकाळी आपल्या विशेष कोच ने आले हा कोच फलाट क्रमांक चारवर लावण्यात आला होता. स्टेशन प्रबंधकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जीएम मित्तल यांनी इ संवाद ऑफिस, एस एन टी ऑफिसचे उदघाटन केले, तर आरपीएफ ऑफिसच्या बांधकामासह स्टेशनची पाहणी केली. रेल्वे स्थानकावरील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला.
मनमाड रेल्वे स्थानकाला महाव्यवस्थापकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 10:01 PM
मनमाड : रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या विकास कामांच्या पाहणी करण्या साठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मनमाड येथे भेट दिली. विशेष कोच मध्ये आलेले महाव्यवस्थापक तब्बल तास भर बाहेर न आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताटकळत प्रतीक्षा करावी लागली.
ठळक मुद्देरेल्वे स्थानकावरील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला.