घोटी : लासलगावहून मुंबईला कांदा घेऊन जाणाºया अवजड वाहनाच्या वाढीव टोल वसुलीसाठी आग्रह धरणाºया टोल कर्मचाºयास ट्रकखाली चिरडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घोटी टोल नाक्यावर घडली. दरम्यान या घटनेत कर्मचाºयाचा जागीच मृत्यू झाला. ट्रक घेऊन फरार झालेल्या चालकाचा टोल कर्मचाºयांनी पाठलाग करून खर्डी येथे पकडल्यानंतर घोटी पोलिसांच्या ताब्यात दिले.शवविच्छेदनानंतर शुक्रवारी सकाळी कर्मचाºयाचा मृतदेह टोल नाक्यावर आणण्यात आला होता. टोल प्रशासनाने या दुर्घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काम बंद आंदोलन सुरू केले. टोल प्रशासनाचा जबाबदार अधिकारी घटनास्थळी येऊन मृत युवकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा आक्र मक पवित्रा टोल कर्मचाºयांनी घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.तब्बल चार तासानंतर टोल प्रशासनाने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लासलगाव येथून मुंबईला कांदा घेऊन जाणारा ट्रक (क्र. एमएच ०४ डीएस ७४१४) गुरुवारी मध्यरात्री घोटी टोल नाक्यावर आला. या ट्रकचा टोल घेतल्यानंतर या लेनमधील कर्मचारी योगेश गोवर्धने यास ट्रक ओव्हरलोड असल्याचे निदर्शनास आले. त्याने संबंधित चालकाला ओव्हरलोडचा टोल भरावा लागेल असे सांगितले. मात्र त्यांनी टोल भरण्यास नकार दिला. यामुळे दोघांत शाब्दिक चकमक झाली. योगेशने ट्रक बाजूला घ्या असे चालकाला सांगितले; मात्र चालकाने बेफामपणे आणि सुसाटपणे वाहन चालवून योगेश यास ट्रकखाली चिरडले. अपघातानंतर चालक ट्रक घेऊन फरार झाला. टोल नाक्याच्या कर्मचाºयांनी पाठलाग करून खर्डी येथे ट्रक अडवून त्यास ताब्यात घेऊन घोटी पोलिसांच्या ताब्यात दिले. घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी दखल घेत टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शुक्रवारी शवविच्छेदनानंतर योगेशचा मृतदेह टोल नाक्यावर आणण्यात आला जोपर्यंत जबाबदार अधिकारी येत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला. सकाळी ११ वाजेच्या सुमारास टोलचे मुख्य व्यवस्थापक अनिरुद्ध सिंग घटनास्थळी आले असता संतप्त जमावाकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी तणाव निर्माण झाला होता.मृत गोवर्धने याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केल्यानंतर कर्मचाºयांनी आंदोलन मागे घेतले. यानंतर योगेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी दखल घेत टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.शुक्रवारी शवविच्छेदनानंतर योगेशचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाइकांनी मृतदेह टोल नाक्यावर आणला. टोल प्रशासनाचा जबाबदार अधिकारी जोपर्यंत येत नाही आणि मृत युवकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा आक्र मक पवित्रा घेत कर्मचााºयांनी कामबंद आंदोलन सुरू केले. टोल प्लाझाचे वरिष्ठ व्यवस्थापक अनिरु द्ध सिंग हे सकाळी ११ वाजेच्या सुमारास घोटी टोल नाक्यावर हजर झाले. यावेळी संतप्त कर्मचाºयांनी त्यांना बेदम मारहाण केली.
घोटी टोल नाका : टोल प्रशासनाच्या निषेधार्थ कर्मचाºयांचे काम बंद आंदोलन ट्रक अपघातात टोल कर्मचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:38 AM
लासलगावहून मुंबईला कांदा घेऊन जाणाºया अवजड वाहनाच्या वाढीव टोल वसुलीसाठी आग्रह धरणाºया टोल कर्मचाºयास ट्रकखाली चिरडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घोटी टोल नाक्यावर घडली.
ठळक मुद्देदुर्घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काम बंद आंदोलन सुरूकुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर