क्रिकेट स्पर्धेत घोटी वॉरियर्स संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 07:23 PM2021-02-07T19:23:27+5:302021-02-07T19:24:09+5:30

घोटी : येथील गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या पुढाकारातून घोटी प्रीमिअर लीग सिझन १ क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि.६) चार संघांना प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस ट्रॉफी व रोख बक्षिसाचे वितरण करून समारोप करण्यात आला. या सामन्यात एकूण आठ संघांनी भाग घेतला होता.

Ghoti Warriors team wins cricket tournament | क्रिकेट स्पर्धेत घोटी वॉरियर्स संघ विजेता

गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या स्पर्धेत विजयी संघांना बक्षीस वितरण करतांना मान्यवर.

Next
ठळक मुद्देघोटी सोल्जर संघ उपविजेता : गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने स्पर्धा उत्साहात

घोटी : येथील गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या पुढाकारातून घोटी प्रीमिअर लीग सिझन १ क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि.६) चार संघांना प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस ट्रॉफी व रोख बक्षिसाचे वितरण करून समारोप करण्यात आला. या सामन्यात एकूण आठ संघांनी भाग घेतला होता.

या सामन्यात प्रथम क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे बक्षीस घोटी वॉरियर्स संघाने पटकावले. या संघाचे तुषार नवगिरे व दशरथ भटाटे यांना संदीप किर्वे यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस घोटी सोल्जर संघाने पटकावले. कर्णधार नीलेश काळे, गुरुनाथ दुभाषे यांना ३१ हजार रुपये व ट्रॉफी घोटीचे सरपंच सचिन गोणके व उपसरपंच रामदास भोर यांच्या हस्ते देण्यात आले.
तृतीय क्रमांकाचे बक्षीस घोटी किंग एलेव्हन संघास मिळाले. संघाचे अंबादास दुभाषे, शांताराम लंगडे यांना २१ हजार रुपये व ट्रॉफी माजी सरपंच संजय आरोटे यांच्या हस्ते देण्यात आले. तर चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस घोटी इंडियन या संघाने पटकावले. या संघाचे योगेश भटाटे, गणेश काळे यांना सरपंच सत्यम काळे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. सहा दिवस चाललेल्या या क्रिकेटचे थेट प्रक्षेपण लाइव्ह करण्यात आले होते.

या दरम्यान संदीप किर्वे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, नयना गावित, उदय जाधव, गोरख बोडके, निवृत्ती जाधव, विठ्ठल लंगडे, सचिन गोणके, रामदास भोर, कुलदीप चौधरी, रवींद्र गोठी, अण्णासाहेब पवार, विक्रम मुनोत, समाधान जाधव, निलेश आंबेकर, मनोज चोपडा, गणेश काळे, बाळा गव्हाणे आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी नीलेश काळे, नीलेश आंबेकर, विशाल शिंदे, दशरथ भटाटे, रमेश बोऱ्हाडे, माधव तोकडे आदींनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Ghoti Warriors team wins cricket tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.