कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:18 AM2019-01-01T02:18:51+5:302019-01-01T02:19:13+5:30

ममदापूर येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या आठ दिवसात हरणाचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे.

Ginger death in dogs attack | कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देममदापूर : आठ दिवसात तिसरी घटना

ममदापूर : ममदापूर येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या आठ दिवसात हरणाचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे.
ममदापूर येथील विजय सीताराम साबळे यांच्या मालकीच्या शेतात गावातील शिकारी कुत्र्यांनी दीड ते दोन वर्षे वयाच्या हरणाची शिकार केली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास काही कुत्रे एकमेकांत लढताना विजय साबळे यांनी बघितले व त्या दिशेने जाऊन बघितले असता त्यांना हरीण घायाळ होऊन पडलेले दिसून आले. त्यांनी कुत्र्यांना लांब हुसकावून हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडले आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध केले.
परंतु हरणच्या मानेवर कुत्र्यांनी जबर चावा घेतल्याने हरणाने अगोदरच प्राण सोडला होता. साबळे यांनी सदरची माहिती वनविभागाचे वन परिक्षेत्राधिकारी संजय भंडारी यांना दिली. त्यांनी लगेचच वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ, पोपट वाघ, शेषराव सोनवणे यांना घटनास्थळी पाठवले. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले तेव्हा हरीण मृत झाले होते. नंतर या हरिणीचे दफन करण्यात आले. आठ दिवसातील ममदापूर परिसरातील ही तिसरी घटना आहे. राजापूर येथे एक हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता तर खरवंडी येथे विहिरीत पडलेल्या हरिणाला वनविभागाकडून सुखरूप विहिरीच्या वर काढून जीवदान मिळाले तर तिसरी कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू पडल्याने वन्य प्राणी प्रेमी मध्ये नाराजीचा सूर
आहे. यावर्षी ममदापूर राजापूर खरवंडी देवदरी या भागात भयानक दुष्काळ असल्याने हरीण अन्न व पाण्याच्या शोधात या भागातून काही प्रमाणात स्थलांतर करत आहेत. त्यातच गावाच्या दिशेने आलेल्या हरणांचा विहिरीत पडून कधी रस्ता ओलांडताना तर कधी कुत्र्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागत आहे.

Web Title: Ginger death in dogs attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.