वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 06:41 PM2020-08-04T18:41:34+5:302020-08-04T18:48:43+5:30

येवला : कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने कर्ज माफी द्यावी, बी-बियाणे, शेतीपयोगी औषधे योग्य किंमतीत शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे.

Give loan waiver to deprived farmers too | वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्या

येवला तहसिलदार रोहिदास वारूळे यांना शेतकरीप्रश्नी निवेदन देतांना हितेश दाभाडे, हरिभाऊ महाजन, भगवान जाधव, सुनंदा आव्हाड, संतोष पाटील आदी.

Next
ठळक मुद्देभ्रष्टाचार निर्मुलन समितीची निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने कर्ज माफी द्यावी, बी-बियाणे, शेतीपयोगी औषधे योग्य किंमतीत शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे.
येवला तहसिलदार रोहिदास वारूळे यांना सदर निवेदन देण्यात आले. कर्ज माफीने शेतकºयांना दिलासा मिळाला असला तरी, अद्यापही बहुत्वांशी शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहिले आहेत. या वंचित शेतकºयांनाही कर्जमाफीचा शासनाने लाभ द्यावा. तसेच कोरोनामुळे, वादळी पावसाने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेती व शेतमालांचे मोठे नुकसान झाले आहे. अडचणीतील शेतकºयांना दिलासा म्हणून शासनाने शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, औषधे योग्य किंमतीत उपलब्ध करून द्यावेत, असे सदर निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर हितेश दाभाडे, हरिभाऊ महाजन, भगवान जाधव, सुंनदा आव्हाड, संतोष पाटील, कन्हैयालाल कानडे, निर्मला बुल्हे, शोभा जºहाड, बबन कानडे, सुरेश जºहाड, कविता जºहाड, सागर भागवत, दत्तात्रय जाधव आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Give loan waiver to deprived farmers too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.