विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या; मनसेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:42 PM2020-09-22T23:42:06+5:302020-09-23T01:01:40+5:30
नाशिकरोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे किंवा शिक्षण मंगळसूत्र तारण योजना सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महसूल आयुक्तालयातील मुख्यमंत्री कक्षाला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आपले उद्योग धंदे व नोक-या गमवाव्या लागल्या आहेत. घर चालवणे अवघड झाले आहे. शासकीय व खाजगी शाळांनी आॅनलाइन शिक्षण चालू केले आहे. फी घेताना ताळमेळ दिसत नाही. भरमसाट फी वसुलची धंदा सुरू आहे. फी भरली नाही तर आॅनलाईन शिक्षण तसेच परीक्षा घेतली जात नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी शाळेत जात नसतानाही ट्युशन, कॉम्पुटर, ?क्टिव्हिटी फी, कॅम्पस व लॅब फी वसूल केली जात आहे. पालक व विद्यार्थ्यांची सहनशीलता संपत आहे. मात्र, बेरोजगारीमुळे यंदा फी भरणे जिकरीचे झाले आहे. शासनाने सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करावे किंवा शिक्षण मंगळसूत्र तारण योजना जाहीर करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर मनसे नाशिकरोड विभाग अध्यक्ष विक्रम कदम, प्रकाश कोरडे, संतोष सहाने, प्रमोद साखरे, नितीन पंडीत, कौशल बब्बू पटेल, मयुर कुकडे तसेच पालक चेतन सहाने, सुवर्णा तायडे, नीलम हसे, सोमनाथ कोरडे, अमोल शहा, प्रदीप जैन, पद्मजा ठक्कर, विशाखा जगताप आदींच्या स'ा आहेत.