शहरात गुरुजनांच्या कार्याचा गौरवशिक्षक दिन ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 10:37 PM2020-09-05T22:37:00+5:302020-09-06T00:59:13+5:30
नाशिक : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आॅनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन प्रतिमापूजन करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अध्यापनाचे काम केले. या कार्यक्रमांमधून गुरुजनांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आॅनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन प्रतिमापूजन करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अध्यापनाचे काम केले. या कार्यक्रमांमधून गुरुजनांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कालिका देवी मंदिर ट्रस्ट आणि क्र ीडा साधना यांच्या वतीने आॅनलाइन वेबिनारच्या माध्यमातून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये नाशिक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांतील ९८ शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाला नाशिक विभागाचे आमदार डॉ. सुधीर तांबे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. सुधीर तांबे म्हणाले, शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा दुवा आहे. शिक्षणामुळेच समाजाची प्रगती होते. रवींद्र नाईक यांनी सांगितले, शिक्षकांच्या माध्यमातून सुसंस्कृत समाज तयार होतो आणि देशाची प्रगती होते. शिक्षकांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची आवशक्यता आहे. यावेळी आपली शिक्षणाची जबाबदारी चांगल्या रीतीने पार पडणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचे वाचन करण्यात आले. त्यांचा आॅनलाइन सत्कार करण्यात आला.
संजय पाटील, प्रभाकर सूर्यवंशी, भूषण ओहोळ, सोमनाथ जगदाळे, किरण शिरसाठ, रूपाली चव्हाण, गायत्री सोनावणे, प्रा. सुरेश कोकाटे, यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाची तांत्रिक बाजू अविनाश ढोली यांनी सांभाळली. कार्यक्र माचे प्रस्ताविक कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आनंद खरे आणि बिरारी यांनी केले. आभार नितीन हिंगमिरे यांनी मानले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी शशांक वझे, मनोज खैरनार, आर्यन ढोली, मनोज म्हस्के आदींनी परिश्रम घेतले. डे केअर सेंटर शाळेत आॅनलाइन कामकाज
ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक दिन आॅनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य शरद गिते यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावर्षीचा शिक्षक दिन विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पद्धतीने शिकवून साजरा केला.
संध्या चव्हाण, प्रसाद शर्मा, मीनाक्षी जगताप, जान्हवी पवार, तन्वी जालनेकर, गौरी तायवाडे, ओवी कुलकर्णी, लीना देवरे, राजश्री आपटे, प्रेरणा अहिरे व दर्शन आढाव, शांभवी पारखी, कार्तिक पाटील या विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य केले. गोसावी तंत्रनिकेतन
नाशिकरोड : येथील डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनमध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक प्रा. प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य पूनमचंद जैन, प्रा. पंकज धर्माधिकारी, डॉ. सुरेश पवार, प्रा. मिलिंद राणे, प्रा. सारंग अजनाडकर, प्रा. अभिजित मेहेत्रे, प्रा. घनश्याम बोराटे, प्रा. करिश्मा गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. बुरड यांनी मेडिटेशनद्वारे शिक्षकांना ताण-तणाव विरहित जीवनाचा अनुभव करून दिला. महाराष्ट्र हायस्कूलमध्ये कोविडयोद्ध्यांचा सन्मान
नाशिकरोड : उपनगर येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त कोविडयोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. शारदा विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सुभाषचंद्र वैद्य यांच्या हस्ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात कोविडयोद्धा शिक्षक चंद्रकांत गायकवाड, मनोज कनोजिया, अॅड. मधुकर वाघ, पगारे यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानावरून बोलताना सुभाषचंद्र वैद्य यांनी, खरे शिक्षक महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले हेच आहेत. यांनीच शिक्षणाचा पाया रचला म्हणून त्यांचे शिक्षकदिनी स्मरण करणे गरजेचे आहे, असे सांगितले. प्रेरणा साबळे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश घरटे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत कुलकर्णी केले. तानाजी पाटोळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार वृषाली जायभावे यांनी मानले.
जयकुमार टिब्रेवाला स्कूल
नाशिकरोड : येथील जयकुमार टिब्रेवाला इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका केली. दहावीची विद्यार्थिनी ज्योती मोदियानी हिने मुख्याध्यापक, तर शिक्षक गौरी मालपाठक, मोनाली पाटील, जयश्री कोतवाल आदींनी एक तास अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी गीताद्वारे शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक जयश्री कोतवाल यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी बनविलेले विविध व्हिडीओ व पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन यांचे सादरीकरण स्वप्निल अमृतकर याने केले. केबीएच विद्यालय शिक्षक दिननाशिक : गंगापूररोडवरील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी उपशिक्षक गिरीश कोठावदे यांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जयवंत बोढारे व पर्यवेक्षक रमेश बागुल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक जयवंत बोढारे यांनी वैदिक काळापासून शिक्षकांना गुरु चे स्थान आहे, म्हणुन गुरु -शिष्य संबंधातील पावित्र्य कायम ठेवून त्या मूल्यांची स्मृती जागृत ठेवण्याचा आजचा दिवस आहे, असे सांगितले. कार्यक्र मास ज्येष्ठ शिक्षक क्र ांती देवरे, बळीराम सोनवणे, निलेश देवरे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजकेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेंद्र देवरे यांनी केले. आभारप्रदर्शन नीता बुरकुले यांनी केले.