----
बाह्यवळण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावाबाहेरून जाणाऱ्या बाह्य वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. नाशिक - पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर गावातील वाहतुकीसाठी रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रोड ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे.
---------------
लोखंडी अवजारांंकडे शेतकऱ्यांचा कल
नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागात पूर्वी शेतीची मशागत करण्यासह पेरणीसाठी वापरली जाणारी सर्व अवजारे ही लाकडांपासून बनविली जात होती. मात्र, विज्ञानामुळे प्रगती झाल्याने आधुनिकीकरणाचे वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. आज बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरद्वारे मशागत किंवा पेरणी करीत असले तरी, बैलांच्या साहाय्याने शेती हाकणाऱ्या शेतकऱ्यांकडील लाकडी अवजारे हद्दपार झाली असून, त्यांची जागा लोखंडी अवजारांनी घेतली आहे.
--
विद्यार्थ्यांचा कल जिल्हा परिषद शाळेकडे
नांदूरशिंगोटे : कोरोना प्रादुर्भावामुळे वर्षभरापासून शाळा बंदच असल्या तरी जिल्हा परिषद शाळा समन्वयातून सुरुवातीलाच नवीन उमेद व उत्साहाने कामाला लागल्या आहे. लॉकडाऊन काळातील शिक्षणाच्या वाताहातीनंतर पालकांच्या डोक्यातील इंग्रजीचे खूळ ओसरले असून, अनेकजण जिल्हा परिषद शाळांकडे वळत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.
----------------------
आषाढी एकादशीनिमित्त प्रदक्षिणा
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून भजनी मंडळाने गावातून टाळ-मृदंगाच्या जयघोषात प्रदक्षिणा काढण्यात आली. येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात हरिपाठ, काकडा आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. गावातील महिला मंडळ व वारकरी भक्त सहभागी झाले होते.