डिझाईन बिनाले या जागतिक स्तरावरील प्रदर्शन येत्या २७ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. कोविड-१९ मुळे यंदा प्रदर्शन ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे भरविले गेले आहे. ‘शुद्ध हवा, पाणी, भूमी, ऊर्जा आणि वने’अशी या प्रदर्शनाची यंदाची संकल्पना आहे. गोदावरी स्वावलंबी करण्यासाठी तिचे नैसर्गिक जलस्रोत पुन्हा खुले करावे लागणार आहे. गोदावरीचे नैसर्गिक जलस्रोत हे जिवंत आहे; मात्र काँक्रिटीकरणाखाली ते दाबले गेल्यामुळे नदी मृतावस्थेत पोहोचल्याचा निष्कर्ष नदी अभ्यासक डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी त्यांच्या संशोधन अहवालातून मांडला होता. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका गोदाप्रेमी संस्थेचे देवांग जानी यांनी दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने २०१७ ला दिलेल्या आदेशान्वये मनपा प्रशासनाने स्मार्टसिटीच्या गोदा प्रोजेक्टअंतर्गत पहिल्या टप्प्यात दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीपासून काँक्रीट काढण्यास सुरुवात केली. जेसीबीच्या साहाय्याने काँक्रीट उद्ध्वस्त करण्यात आल्याने गोदावरीचा श्वास मोकळा होऊ लागला. यामुळे नदीचे नैसर्गिक जलस्रोत तर मोकळे होण्यास मदत झाली; मात्र पुराची तीव्रताही यामुळे कमी होणार असल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. नदी संवर्धनासाठी ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरल्यामुळे बस्ते यांनी याबाबत केलेेले संशोधन इंग्लंडच्या पर्यावरण संस्थेने भरविलेल्या प्रदर्शनाकरिता सादर केले. त्यांच्या बंगलोरमधील चमूने या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर या प्रदर्शनात नाशिकची गोदावरी पुनरुज्जीवित करण्याची आयडिया झळकली.
--इन्फो--
५० देशांमधून १५९ पर्यावरणस्नेही प्रकल्पांना स्थान
५० देशांमधून पर्यावरणपूरक अशा प्रकल्पांची मागणी यासाठी करण्यात आली होती. १५९ प्रकल्पांची यामध्ये निवड केली गेली. या प्रदर्शन पर्यावरण संवर्धनाबाबत शाश्वत विकासातून मूलभूत बदल घडविणाऱ्या प्रकल्पांना स्थान दिले जाते. हे प्रदर्शन २०१६ साली सर जॉन सोरेल आणि बेनई व्हांश यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक व्यासपीठ म्हणून सुरू केले. इंग्लंडमधील काही पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत या प्रदर्शनाची सुरुवात झाली आहे.
---कोट--
वैज्ञानिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पद्धतीने नदी संवर्धनाबाबत केलेला अभ्यास आणि मांडलेल्या संशोधन अहवालाला थेट जागतिक स्तरावरील प्रदर्शनात स्थान मिळणे ही बाब माझ्यासाठी नक्कीच समाधान देणारी आहे. नाशिककरांची जीवनदायिनी असलेली गोदावरी पुनरुज्जीवित करणारी ही संकल्पना नक्कीच नदी संवर्धनाकरिता मूलभूत बदल घडविणारी ठरेल याचा विश्वास वाटतो.
- डॉ. प्राजक्ता बस्ते, नदी अभ्यासक, नाशिक
--
गोदावरी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प जगप्रसिद्ध लंडन डिझाईन बिनालेच्या प्रदर्शनात समाविष्ट झाला ही अभिमानाची बाब आहे.
गोदावरीच्या ५ कुंडांचा भाग काँक्रिटीकरणमुक्त झाल्यामुळे त्यातून मुबलक प्रमाणत जिवंत जलस्रोत प्राप्त झाले आहे. हे पुराव्यानिशी सिद्ध केले. याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली याचा आनंद वाटतो.
- देवांग जानी, गोदाप्रेमी
===Photopath===
220621\22nsk_36_22062021_13.jpg~220621\22nsk_37_22062021_13.jpg~220621\22nsk_38_22062021_13.jpg
===Caption===
गोदावरी पुर्नजिवित~गोदावरी पुर्नजिवित~गोदावरी पुर्नजिवित