गोदावरीसह उपनद्यांना समृद्धीसाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:19 PM2019-07-20T23:19:06+5:302019-07-21T00:20:00+5:30
गोदावरी नदी निर्मल प्रवाही वाहत राहो तिच्या सान्निध्यात प्रत्येक प्राणिमात्रास आरोग्य व समृद्धी लाभो याकरिता गोदावरी नदीसह तिच्या उपनद्यांचे पर्यावरण व गोदाप्रेमींच्या वतीने पूजन करून प्रार्थना करण्यात आली. तपोवनातील गोदा-कपिला संगम येथे हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
नाशिक : गोदावरी नदी निर्मल प्रवाही वाहत राहो तिच्या सान्निध्यात प्रत्येक प्राणिमात्रास आरोग्य व समृद्धी लाभो याकरिता गोदावरी नदीसह तिच्या उपनद्यांचे पर्यावरण व गोदाप्रेमींच्या वतीने पूजन करून प्रार्थना करण्यात आली. तपोवनातील गोदा-कपिला संगम येथे हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
यावेळी वाहतूक शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक अन्वर अहमद शेख यांच्या हस्ते नदीपात्रात नारळ सोडून जलपूजन करण्यात आले. नदीला कोणतीही जात धर्म नसते, नदी जीवन आहे, ती प्रवाहित व प्रदूषणमुक्त राहणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, गोदावरी नदी आपली जीवनदायनी असल्याने प्रत्येक नाशिककर नागरिकाने नदीच्या संरक्षणासाठी प्रदूषण करणाऱ्यांना रोखले पाहिजे. तसेच स्वत:देखील जलप्रदूषण करणार नाही अशी शपथ घेतली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी निशिकांत पगारे, प्रा.सोमनाथ मुठाळ, महंत बैजनाथ महाराज, कचरू वैद्य, रोहित कानडे, रवि पाटील, रोहित पारख, हेमंत जाधव, भारतीताई जाधव, भारतीताई माळी, सोनाली बेहरा, प्रा. सचिन भामरे, विशाल पाटील, दीपाली जगताप, सविता परदेशी, ऋ षिकेश खैरे, परिसरातील विक्रे ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्र माचे संयोजन योगेश बर्वे व दीपक बैरागी यांनी केले व सुनील परदेशी यांनी आभार मानले.