अमोल पालेकर, सुभाष अवचट यांना गोदावरी गौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:01 AM2018-01-21T00:01:48+5:302018-01-21T00:02:01+5:30
गायक पंडित सत्यशील देशपांडे, समाजसेवक डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, चित्रकार सुभाष अवचट आणि कमला मिल अग्निकांडातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणारे पोलीस शिपाई सुदर्शन शिंदे व सुरक्षा रक्षक महेश साबळे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
नाशिक : गायक पंडित सत्यशील देशपांडे, समाजसेवक डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, चित्रकार सुभाष अवचट आणि कमला मिल अग्निकांडातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणारे पोलीस शिपाई सुदर्शन शिंदे व सुरक्षा रक्षक महेश साबळे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी पुरस्कारांची घोषणा केली. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे स्वरुप असलेल्या या पुरस्कारांचे १० मार्चला कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी नाशिकला वितरण होईल. यंदाचे पुरस्कारांचे चौदावे वर्ष आहे.
१९९२ पासून सहा क्षेत्रांत
उल्लेखनीय कामगिरी करणाºयांना मान्यवरांना एक वर्षाआड सन्मानित केले जाते.