नाशिक : शरीर नाशवंत असले तरी हरिनामाच्या उच्चाराने ईश्वरप्राप्ती शक्य आहे. नाशवंत शरीरातील मन विचारांनी श्रीमंत होण्यासाठी हरिनामच प्रभावी आहे, असे विवेचन आनंदमूर्ती गुरु माँ यांनी अमृतवर्षा सत्संग सोहळ्यातील प्रवचन पुष्प गुंफताना केले.नाशिकच्या ऋषी चैतन्य कथा समितीने आयोजित केलेल्या अमृतवर्षा सत्संग सोहळ्यात आनंदमूर्ती गुरु माँ बोलत होत्या. आनंदमूर्ती गुरुमाँ यांनी प्रवचनात पुढे म्हटले की, शिव विष्णू यांच्यात कोणताही भेद नसून दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. चांगले पेरले तर चांगलेच उगवेल, म्हणून चांगल्या विचारांची पेरणी करण्यासाठी परमार्थाची कास धरावी लागेल. प्रवचनप्रसंगी रामभूमी नाशिकच्या पवित्र भूमीत हरिनामाचा गजर आनंदमूर्ती गुरु माँ यांनी केला. उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.ध्येय साध्य करण्यासाठी चढाओढीच्या स्पर्धेने विद्यार्थी गुदमरतो आहे. अभ्यास करीत राहिल्याने ध्येय साध्यतेसाठी भरीव योगदान मिळेल. अभ्यासाला पारमार्थिक चिंतनाची जोड द्यावी, असा आग्रह आनंदमूर्ती गुरु माँ यांनी गुरुगोविंदसिंग विद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केला.
‘हरिनामा’च्या उच्चाराने ईश्वरप्राप्ती शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:33 PM
शरीर नाशवंत असले तरी हरिनामाच्या उच्चाराने ईश्वरप्राप्ती शक्य आहे. नाशवंत शरीरातील मन विचारांनी श्रीमंत होण्यासाठी हरिनामच प्रभावी आहे, असे विवेचन आनंदमूर्ती गुरु माँ यांनी अमृतवर्षा सत्संग सोहळ्यातील प्रवचन पुष्प गुंफताना केले.
ठळक मुद्देआनंदमूर्ती गुरु माँ : सत्संग सोहळा