नाशिक : मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या पाहता उमेदवाराला पोलिंग एजंट नियुक्त करण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. कार्यकर्ते अगोदरच ‘बुक’ झाल्यामुळे अनेक उमेदवारांना तर पोलिंग एजंट मिळणे कठीण झाले आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील मतदारसंख्येनुसार मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांची ही संख्या जवळपास २०० च्यापुढे आणि जास्तीत जास्त ३९० पर्यंत आहे. मतदान केेंद्रांची ही संख्या पाहता प्रत्येक केंद्रावर किमान चार याप्रमाणे आपला पोलिंग एजंट नियुक्त करण्यासाठी हजार- दीड हजाराच्या पुढे कार्यकर्ते लागणार आहेत आणि ‘पेड’ कार्यकर्त्यांच्या जमान्यात एवढे कार्यकर्ते मिळणेही दुरापास्त असल्यामुळे उमेदवारांना अनेक मतदान केंद्रे प्रतिनिधीशिवाय सोडून द्यावी लागणार आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवार आपल्याच प्रभावक्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार आहेत.
पोलिंग एजंट नियुक्त करण्यासाठी चांगलीच धावपळ
By admin | Published: October 15, 2014 12:54 AM