मुद्रणालयाचा गोरेवाडी गेट सहा महिन्यांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:39 PM2020-09-07T23:39:18+5:302020-09-08T01:30:47+5:30
नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालय स्टाफ क्वॉर्टर येथील गोरेवाडी गेट मुद्रणालय प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून पुन्हा बंद केल्याने गेल्या सहा महिन्यांपासून गोरेवाडीवासीयांची मोठी गैरसोय होत असून, हजारो नागरिकांना दररोज मोठा वळसा घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालय स्टाफ क्वॉर्टर येथील गोरेवाडी गेट मुद्रणालय प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून पुन्हा बंद केल्याने गेल्या सहा महिन्यांपासून गोरेवाडीवासीयांची मोठी गैरसोय होत असून, हजारो नागरिकांना दररोज मोठा वळसा घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.
गेल्या वर्षी मुद्रणालय प्रशासनाला धमकीचे निनावी पत्र आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव स्टाफ क्वॉर्टर येथील गोरेवाडी गेट बंद करण्यात आले होते. यामुळे गोरेवाडीवासीयांना के. एन. केला शाळा रस्त्याने ये-जा करावी लागत होती. मात्र वृत्तपत्रात गैरसोयीबाबत वृत्त छापून आल्यानंतर गेट पुन्हा उघडण्यात आला होता. तेथून प्रारंभी कामगारांनाच सोडले जात होते. वनिता विकास शाळेत जाणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी यांची व परिसरातील रहिवाशांची गरज लक्षात घेऊन गोरेवाडी गेट सुरू करण्यात आले होते.
मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुद्रणालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लागलीच स्टाफ क्वॉर्टर येथील गोरेवाडी गेट बंद करून टाकला. गेल्या सहा महिन्यांपासून गोरेवाडी गेट बंद असल्याने गोरेवाडीवासीयांना दूरवरून के. एन. केला शाळा येथून जेलरोड मार्गे यावे-जावे लागत आहे. त्यामुळे सर्वांचीच मोठी गैरसोय होत आहे. इंधन, वेळ जास्त खर्च होत आहे. तसेच जवळचा मार्ग सोडून लांबवरून फिरून यावे-जावे लागत असल्याने जेलरोड रस्त्यावर वाहतुकीचा भारदेखील वाढला आहे. कोरोनाची सबब पुढे करून मुद्रणालय प्रशासन आडमुठे धोरण अंगीकारत असल्याने सर्वसामान्य जनतेला त्रास होत असल्याची तक्रार केली जात आहे. जेलरोड, गोरेवाडी भागातून येणारे प्रेस कामगार यांनादेखील गेट बंद असल्याकारणाने जेलरोड कोठारी कन्या शाळा येथूनच मुद्रणालयात यावे-जावे लागत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी लष्कर व केंद्र शासनाची सुरक्षितता व गोपनीयताबाबतची महत्त्वाची अनेक कार्यालये सुरू केली तेव्हा ती शहराच्या एका बाजूला कोपऱ्यात होती. मात्र शहराचा चोहोंबाजूने विकास झाल्याने केंद्र शासनाची ती कार्यालये लोकवस्तीमध्ये आली
आहेत.
जिमखाना येथे अनेकजण फिरण्यासाठी, व्यायामासाठी येत असतात. गेट बंद असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या कोपºयापासून गोरेवाडी प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षांना विभागीय आयुक्त कार्यालय येथूूून वळून दूरवरून यावे-जावे लागत आहे.स्टाफ क्वॉर्टर येथील गोरेवाडी गेट गेल्या सहा महिन्यांपासून बंद केल्याने गोरेवाडी भागातील सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना लांबवरून यावे-जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. गोरेवाडी भागातील नागरिक वर्षानुवर्षे स्टाफ क्वॉर्टर येथील गोरेवाडी गेटमधूनच ये-जा करत होते. मुद्रणालय प्रशासन व कामगार नेत्यांनी यामध्ये लक्ष घालून गोरेवाडी गेट सुरु करावा. -संतोष साळवे, नगरसेवक