गोवर - रूबेला लसीकरण मोहिमेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 06:43 PM2018-12-09T18:43:08+5:302018-12-09T18:43:51+5:30

नऊ महिने ते १५ वर्षाखालील बालकांच्या गोवर-रूबेला लसीकरणासाठी देशपातळीवर राबविण्यात येत असलेल्या अभियानास सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Gover - Respond to Rubella Vaccination Campaign | गोवर - रूबेला लसीकरण मोहिमेला प्रतिसाद

दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात लसीकरण मोहीमेचा जगन्नाथ भाबड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सरपंच मुक्ता मोरे, अशोक काळे, श्रीराम आव्हाड, रामदास आव्हाड, संजय आव्हाड, योगेश आव्हाड आदी.

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र

सिन्नर : नऊ महिने ते १५ वर्षाखालील बालकांच्या गोवर-रूबेला लसीकरणासाठी देशपातळीवर राबविण्यात येत असलेल्या अभियानास सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हा परिषद शाळा, जायगाव
नायगाव - जायगाव येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गोवर-रूबेला लसीकरणाचा शुभारंभ आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी योगिता डॉ. ठाकरे यांच्या हस्ते झाले. सरपंच नलिनी गिते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुरेश गिते, शालेय समिती अध्यक्ष दत्ता दिघोळे, विलास गिते, मुख्याध्यापक महेश महाले, आर. बी. वाकचौरे, आरोग्य सेविका एस. डी. साबळे,आदीसह सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शाळेतील तीस विद्यार्थ्यांना गोवर-रूबेलाची लस देण्यात आली.
जिल्हा परिषद शाळा, वावी
सिन्नर तालुक्यातील वावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरोग्य केंद्राच्या वतीने मोहीम राबविण्यात आली. सरपंच नंदा गावडे व उपसरपंच विजय काटे यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहीमेस सुरूवात करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख कुसुम निकुंभ, मुख्याध्यापक रंजना पवार, अशोक वेलजाळी, सुभाष थोरात, हेमंत खर्डे, आदींसह पालक, शिक्षक, महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कूल, दापूर
रयत शिक्षण संस्थेच्या दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात लसीकरण मोहीमेचा पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच मुक्ता मोरे, उपसरपंच अशोक काळे, श्रीराम आव्हाड, कचरू आव्हाड, रामदास आव्हाड, पी. व्ही. शिरसाट आदी उपस्थित होते. विद्यालयातील ८५३ एकूण ५९१ विद्यार्थ्यांना गोवर व रूबेला लसीकरण करण्यात आले.
पाथरे हायस्कूल
पाथरे : पाथरे हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात गोवर व रूबेला लसीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना लसीकरण करून मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शालेय समितीचे अध्यक्ष आर. बी. चिने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर पाथरे बुद्रुकचे सरपंच शरद नरोडे, पाथरे खुर्दचे उपसरपंच सुकदेव गुंजाळ, वारेगावचे सरपंच मिनानाथ माळी, गोरक्षनाथ पडवळ, अमोल दवंगे, कैलास चिने, प्राचार्य पी. एन. रानडे, पर्यवेक्षक एस. बी. जाधव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, आरोग्य सहाय्यक बी. बी. पाटील यावेळी उपस्थित होते. या लसीकरण मोहिमेअंतर्गत विद्यालयातील २९१ मुली तर ३०० मुलांना मिळून एकूण ५९१ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
संजय शेलार यांनी प्रास्ताविक केले. किरण कुलकर्णी यांनी सूत्रंचालन केले. बाळासाहेब शिरसाट यांनी आभार मानले. यावेळी रावसाहेब मोकळ, रामचंद्र थोरात, रंगनाथ चिने, स्काऊट गाईड प्रमुख उत्तम खैरनार, नवनाथ कांबळे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Gover - Respond to Rubella Vaccination Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.