शहरं
Join us  
Trending Stories
1
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
2
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
3
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
4
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
5
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
6
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
7
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
8
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
9
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
11
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
12
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
13
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
14
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
15
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
16
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
17
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
18
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
19
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
20
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...

महावितरणकडे ग्रामपंचायतीची भाडेपट्टी थकीत; तरी वीज केली खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 10:19 PM

कळवण : महावितरण कंपनीकडे ओतूर वीज उपकेंद्राच्या भाडेपट्टीपोटी ग्रामपंचायतीची नऊ लाख रुपये गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकी आहे. पत्रव्यवहार करूनदेखील महावितरण थकबाकी भरत नाही. मात्र ग्रामपंचायतकडे महावितरणने वीज थकबाकीचे कारण देत पथदीप वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गावात अंधार असल्यामुळे उत्सवात तरी गावात रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देवीज पुरवठा खंडीत केल्याने गाव 8 दिवसापासून अंधारात

कळवण : महावितरण कंपनीकडे ओतूर वीज उपकेंद्राच्या भाडेपट्टीपोटी ग्रामपंचायतीची नऊ लाख रुपये गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकी आहे. पत्रव्यवहार करूनदेखील महावितरण थकबाकी भरत नाही. मात्र ग्रामपंचायतकडे महावितरणने वीज थकबाकीचे कारण देत पथदीप वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गावात अंधार असल्यामुळे उत्सवात तरी गावात रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, महावितरणने सबस्टेशनची भाडेपट्टी सहा लाख रुपये ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जमा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. महावितरणने थकबाकी भरल्यानंतर ग्रामपंचायत लगेच थकबाकी भरण्यास तयार असल्यामुळे त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. महावितरणनेदेखील ग्रामपंचायतीची सहा लाख रुपये थकबाकी द्यावी; नाही तर वीज उपकेंद्राला टाळे ठोकू, असा इशारा दिगंबर पवार, ज्ञानेश्वर पवार यांनी दिला आहे.ओतूर ग्रामपंचायतीचे वीज बिल नऊ लाख रुपये थकल्याने महावितरण कंपनीने वसुलीच्या नावाखाली गणेशोत्सवाच्या कालावधीत पथदिपांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गाव अंधारात आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव महावितरणमुळे ग्रामस्थांना अंधारात साजरा करावा लागला. ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा योजनेची थकबाकी असून चालू महिन्याचे वीज बिल आठ हजार २०० रोख भरणा करून महावितरणने गावाला सहकार्य केल्यामुळे गावात पाणीपुरवठा सुरळीत आहे.मात्र पथदीप बंद असल्याने गावात रात्रभर अंधार असतो. त्यामुळे रात्री-अपरात्री ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. शेतात जाणेही कठीण झाले आहे. संपूर्ण रात्र गावात अंधार असल्याने गावात स्मशानशांतता पसरते. गावातील भटक्या कुत्र्यांची व सध्या पावसाळा असल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्याची भीती वाढली आहे.अंधाराचा फायदा घेत चोरटेही सक्रिय होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची अडचण ओळखून महावितरण कंपनीने तत्काळ ग्रामपंचायतीचा पथदीप वीजपुरवठा सुरळीत करून गावातील अंधार घालवावा, अशी मागणी सरपंच पार्वता गांगुर्डे, उपसरपंच मंगेश देसाई, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेचे नियमित वीज बिल भरले आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. ग्रामपंचायतीकडे महावितरणची नऊ लाख रुपये थकबाकी आहे. महावितरण कंपनीकडे ग्रामपंचायतीची सबस्टेशनची भाडेपट्टी सहा लाख रुपये थकबाकी आहे. याबाबत नियमित पत्रव्यवहार केला आहे. थकबाकी मिळाल्यानंतर वीज बिल बाकीत भरणा केला जाईल.पार्वता गांगुर्डे, सरपंच, ओतूर.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतelectricityवीज