नाशिकचे आजोबा लयभारी, पंचाहत्तरीतही हौस न्यारी; 10 हजार जणांचा मोफत प्रवास

By संदीप भालेराव | Published: September 1, 2022 08:28 PM2022-09-01T20:28:03+5:302022-09-01T20:28:32+5:30

पाच दिवसात तब्बल १० हजार ७१७ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला तर अर्धेे तिकीटाचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठांची संख्या ८००७३ इतकी आहे.

Grandfather Laybhari of Nashik, Haus Nyari even at seventy-five; Free travel for 10 thousand people | नाशिकचे आजोबा लयभारी, पंचाहत्तरीतही हौस न्यारी; 10 हजार जणांचा मोफत प्रवास

नाशिकचे आजोबा लयभारी, पंचाहत्तरीतही हौस न्यारी; 10 हजार जणांचा मोफत प्रवास

Next

संदीप भालेराव

नाशिक: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षावरील नागरिकांना एस.टी. बसमधून मोफत प्रवास करण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. राज्यभरातून या योजनेला ज्येष्ठांचा उदंड प्रतिसाद लाभला आहेच त्यात नाशिक जिल्हा देखील मागे नाही. नाशिकमध्ये अवघ्या पाचच दिवसात दहा हजार ज्येष्ठ नागरिकांना बसमधून मोफत प्रवासाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे प्रवास करणाऱ्यांमध्ये अर्धे तिकीटाची योजना असलेल्या ६५ वर्षवयावरील ज्येष्ठांपेक्षा ७५ वयावरील ज्येष्ठांची संख्या अधिक आहे.    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने ७५ वर्षावरील ज्येष्ठांसाठी राज्य शासनाने योजनेची घोषणा केली होती. दि. २६ ऑगस्टपासून प्रत्यक्ष योजनेला सुरूवात झाली आणि अगदी पहिल्या दिवसापासूनच नाशिकमधील ज्येष्ठांनी योजनेला उदंड प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील १३ डेपोंमध्ये योजनेचे लाभार्थी दिसून आले. त्यामध्ये नाशिक डेपोतून मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या पाच दिवसात तब्बल १० हजार ७१७ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला तर अर्धेे तिकीटाचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठांची संख्या ८००७३ इतकी आहे.

राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांना ५० टक्के सवलतीच्या दरात प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. दि. २६ ऑगस्टपासून या योजनेचा शुभारंभ झाला. नाशिक जिल्ह्यातील नाशिक-१ आगारातून मोफत प्रवासाचा लाभ घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. अनेकांनी पुणे, त्र्यंबकेश्वर, वणी असा प्रवास केल्याची माहिती महामंडळाच्या सुत्रांनी दिली. मोफत प्रवासाचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे देखील महामंहळाकडून सांगण्यात आले.

Web Title: Grandfather Laybhari of Nashik, Haus Nyari even at seventy-five; Free travel for 10 thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.