ग्रामसडक योजनेत सौंदाणे गटात रस्ते मंजूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 07:53 PM2017-09-14T19:53:08+5:302017-09-14T19:53:18+5:30

Grant the roads in the Saunda group under the Gram Sadak Yojana | ग्रामसडक योजनेत सौंदाणे गटात रस्ते मंजूर करा

ग्रामसडक योजनेत सौंदाणे गटात रस्ते मंजूर करा

Next


नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सौंदाणे जिल्हा परिषद गटातील रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मंजूर करावेत, या मागणीचे निवेदन बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सौंदाणे जिल्हा परिषद गटातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, त्यातील नऊ रस्ते मंजूर होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यात पाटणे ते वाके नांदगाव गुंजाळवाडी निंबोळा रस्ता, टाकळी ते मांजरे रस्ता, प्रजिमा ०८ जळगाव (निं.) ते काळेवाडी रस्ता, एमडीआर- ९९ ते वाघदेवमाथा, सोनज ते वºहाणेपाडा रस्ता, सोनज ते पवारवाडी रस्ता (ग्रामा- ६७), एमएसएच- ८ नगाव ते मडकीपाडा रस्ता, सावकारवाडी ते झाडी (एमडीआर- १४) एमडीआर- ६२ रस्ता, नगाव कौळाणे सोनज टाकळी शिरसोंडी रस्ता आदी रस्त्यांचा समावेश मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत करावा, असे या निवेदनात म्हटले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या अधिकाºयांना त्याबाबत आदेश दिले आहेत.

Web Title: Grant the roads in the Saunda group under the Gram Sadak Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.