द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 11:01 PM2020-04-01T23:01:42+5:302020-04-01T23:02:12+5:30
कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉकडाउन असल्याने द्राक्ष उत्पादन मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्ल्याने बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. तर काही व्यापारी अगोदर झालेले व्यवहार रद्द करत आहेत.
चांदोरी : कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉकडाउन असल्याने द्राक्ष उत्पादन मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्ल्याने बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. तर काही व्यापारी अगोदर झालेले व्यवहार रद्द करत आहेत.
काही ठिकाणी शेतकरी कुठलाही व्यवहार न करता फक्त द्राक्षबाग रिकामी करून घेत आहे. सद्य:स्थितीला द्राक्षे मनुके होण्याच्या मार्गावर आहेत. मागील दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादकांना पूरपाण्याचा फटका तर बदलत्या वातावरणाचा तडाखा, तर कधी दर नसल्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे मुश्किल झाले आहे. काही ठिकाणी व्यापारी व्यवहार न करता माल घेत आहे.
बेदाणा व्यापाऱ्यांना मोठी विनवणी करावी लागत आहे. आता द्राक्षबाग रिकामी करणे हेच उत्पादकांचे महत्त्वाचा उद्देश आहे. कारण वेळेत द्राक्ष वेलीवर असलेले द्राक्ष काढले नाही तर पुढील वर्षी पीक हाती येणार नाही, यासाठी मजूर उपलब्ध नाही. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना काम करावे लागते आहे.
यंदा उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. चाळीस ते पन्नास रु पये प्रतिकिलोचा माल चार ते पाच रु पयांना द्यावा लागतो आहे. मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
- माणिक गडाख,
द्राक्ष उत्पादक, चांदोरी