हरसूलच्या जलोथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:49 AM2019-12-23T01:49:23+5:302019-12-23T01:49:56+5:30

‘एक धाव पाण्यासाठी, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन जल परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जलोथॉन स्पर्धेत ५५० स्पर्धकांनी धाव घेतली. यावेळी १०० स्वयंसेवकांनीही या स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला.

Great response to Harsul's Zalothon tournament | हरसूलच्या जलोथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद

हरसूल येथे झालेल्या जलोथॉन स्पर्धेचे झेंडा दाखवून उद्घाटन करताना जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, धावपटू कविता राऊत, साहेबराव पाटील, विशाल टकले, महेश तुंगार, रवींद्र भोये आदी.

Next
ठळक मुद्देएक धाव पाण्यासाठी : जल परिषदेची ग्रामीण भागात जनजागृती

पेठ : ‘एक धाव पाण्यासाठी, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन जल परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जलोथॉन स्पर्धेत ५५० स्पर्धकांनी धाव घेतली. यावेळी १०० स्वयंसेवकांनीही या स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला.
हरसूल येथे जल परिषदेच्या निमित्ताने जलोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, धावपटू कविता राऊत, साहेबराव पाटील, कामिनी केवट, हरसूल पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले, शिक्षणविस्तार अधिकारी राज आहेर,रवींद्र भोये, प्राचार्य मोतीराम देशमुख, महेश तुंगार आदींच्या उपस्थितीत झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.
दोन गटांत झालेल्या जलोथॉन स्पर्धेत ५५० स्पर्धकांनी उपस्थिती नोंदवित धाव घेतली. हरसूल हा भाग खेळाडूंची खाण असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले.आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या पावलावर पाऊल ठेवत धावपटू ताई बामणे, वर्षा चौधरी घडल्या आहेत. या भागातील खेळाडूंमधील अंगभूत कला, धाडसीवृत्ती ध्येय डोळ्यासमोर ठेवून विविध खेळामध्ये प्रावीण्य मिळवीत असल्याचे प्रतिपादन नाईक यांनी केले.
स्पर्धेचा निकाल
मुलींचा लहान गट : सानिका चौधरी, रविना चौधरी, रिंकू चौधरी, ताई पवार, मनीषा कुंभार.
च्मुले : अजय महाले, अनिल चौधरी, अनिल भोये, प्रवीण चौधरी, कांतीलाल आचारी.
च्मोठा गट मुली : विनता भोबे,रेखा शिंगाडे,दुर्गा चौधरी,सुशीला चौधरी,सरस्वती चौधरी.
च्मुले : ज्ञानेश्वर पारधी, ज्ञानेश्वर निबारे, भागीनाथ पवार, सुरेश चौधरी, संदीप चौधरी, मुकेश पवार.
च्या स्पर्धेसाठी जल परिषदच्या १०० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा यशस्वीतेसाठी जल परिषद स्वयंसेवक, ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.

Web Title: Great response to Harsul's Zalothon tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.