हिरवा वाटाणा, गाजराची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:24 AM2018-11-24T00:24:31+5:302018-11-24T00:24:48+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरवा वाटाणा तसेच गाजराची आवक वाढल्याने अन्य सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव घसरलेले आहेत. पंधरवड्यापूर्वी शंभर रुपये प्रति किलो असा दर गाठणाऱ्या वाटाण्याचे दर शुक्रवारी ३५ रुपये किलोवर आल्याने तसेच नाशिकसह राज्यातील अन्य सर्वच बाजारपेठेत स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने बाजारभाव घसरले आहेत.
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरवा वाटाणा तसेच गाजराची आवक वाढल्याने अन्य सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव घसरलेले आहेत. पंधरवड्यापूर्वी शंभर रुपये प्रति किलो असा दर गाठणाऱ्या वाटाण्याचे दर शुक्रवारी ३५ रुपये किलोवर आल्याने तसेच नाशिकसह राज्यातील अन्य सर्वच बाजारपेठेत स्थानिक शेतमाल सुरू झाल्याने बाजारभाव घसरले आहेत.
मुंबईच्या बाजारात पर राज्यांतील माल मोठ्या प्रमाणावर आयात झाल्यामुळे नाशिकच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. हिवाळ्याच्या कालावधित वाटाणा तसेच गाजराला ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याने नोव्हेंबर महिन्यात दरवर्षीच बाजारभावात घसरण होत
असल्याचे नाशिक कृषी
बाजार समितीतील भाजीपाला व्यापाºयांनी सांगितले. ग्राहकांना
किरकोळ बाजारात वाटाणा ३५ रुपये, तर गाजर १५ रुपये किलो दराने विक्री होत आहे.
नाशिक बाजार समितीतून मुंबई शहर व उपनगरात दैनंदिन मोठ्या प्रमाणात भाजीपाला मालाची निर्यात केली जाते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्य प्रदेश, इंदूर आणि ग्वाल्हेर या भागातून
सध्या मोठ्या प्रमाणात हिरवा वाटाणा विक्रीसाठी दाखल होत आहे पंधरवड्यापूर्वी १२० रुपये प्रति किलो दराने वाटाणा विक्री झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत भाजीपाल्याचे दर कोसळलेले आहेत. मुंबई शहरात मध्य प्रदेश तसेच गुजरात राज्यातील शेतमाल मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागल्याने आणि त्यातच हिरवा वाटाणा व गाजर आवक वाढल्याने बाजारभाव घसरले आहे. वर्षभरात नोव्हेंबरपासून काही महिने वाटाणा बाजारात विक्रीसाठी येत असतो.