औरंगाबादकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:25 AM2021-03-13T04:25:28+5:302021-03-13T04:25:28+5:30
नाशिक : सावानाच्यावतीने वाचनालयाचे माजी अध्यक्ष ग्रंथालय भूषण मु. शं. औरंगाबादकर यांच्या स्मृतिदिनी त्यांचे स्नेही हरिभाऊ धात्रक यांच्या ...
नाशिक : सावानाच्यावतीने वाचनालयाचे माजी अध्यक्ष ग्रंथालय भूषण मु. शं. औरंगाबादकर यांच्या स्मृतिदिनी त्यांचे स्नेही हरिभाऊ धात्रक यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी धात्रक यांनी मैत्री कशी असावी हे औरंगाबादकर यांच्याकडून शिकावे इतके ते आदर्श मित्र होते, असे सांगितले. ते साखरेचे व्यापारी होते आणि त्यांचे बोलणेही सदैव गोड असल्याने त्यांना आम्ही ‘शुगरकिंग’ असे संबोधित होतो, अशी आठवणदेखील धात्रक यांनी सार्वजनिक वाचनालयात झालेल्या कार्यक्रमात सांगितली. यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी करून दिला. ॲड. अभिजीत बगदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य सचिव गिरीश नातू यांनी केले. कार्यक्रमाला वाचनालयाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष वसंत खैरनार, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी, बालभवन प्रमुख संजय करंजकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, ओमकार धात्रक यांच्यासह सावाना सेवकवृंद उपस्थित होता.