दीनानाथ मंगेशकर यांना ‘बागेश्री’तर्फे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:57 AM2019-04-25T00:57:32+5:302019-04-25T00:57:48+5:30
मराठी संगीत रंगभूमीतील ज्येष्ठ गायक व कलावंत दीनानाथ मंगेशकर यांना बागेश्रीच्या कलाकारांनी पूर्वी गाजलेल्या संगीत नाटकातील वैविध्यपूर्ण नाट्यपदे सादर करीत संगीतमय आदरांजली वाहिली.
नाशिक : मराठी संगीत रंगभूमीतील ज्येष्ठ गायक व कलावंत दीनानाथ मंगेशकर यांना बागेश्रीच्या कलाकारांनी पूर्वी गाजलेल्या संगीत नाटकातील वैविध्यपूर्ण नाट्यपदे सादर करीत संगीतमय आदरांजली वाहिली.
शिवाजी रोडवरील शिवाजी उद्यानात असलेल्या मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या पुतळ्यासमोरील प्रांगणात बागेश्री निर्मित संगीत ‘शुरा मी वंदीले’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी नॅबचे सचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, गायक शशांक हिरे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
गायिका सावनी कुलकर्णी, शर्वरी पद्मनाभी यांनी नाट्यपद तालासुरात सादर केले. नाट्यसमीक्षक चारूदत्त दीक्षित यांनी दीनानाथ मंगेशकर यांच्या संगीतमय वाटचालीची माहिती सांगितली. विविध गीतांना दीपक दीक्षित (संवादिनी), चारूदत्त दीक्षित यांनी संगीत साथ केली. याप्रसंगी डॉ. आनंद सराफ, गायिका संगीता बाविस्कर, अॅड. अपूर्वा सराफ, विजय राऊत आदी उपस्थित होते. स्मिता पद्मनाभी यांनी प्रास्ताविक केले.
सावानातर्फे अभिवादन
गायक, नाट्य अभिनेते व संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने सावानातर्फे अभिवादन करण्यात आले. माजी अध्यक्ष अण्णा झेंडे व ज्येष्ठ गायक पंडित अविराज तायडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, जयप्रकाश जातेगावकर, अॅड. अभिजित बगदे, उदयकुमार मुंगी, बी. जी. वाघ, डॉ. शंकर बोºहाडे, गिरीश नातू उपस्थित होते.