लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये व सामाजिक संस्थांच्या वतीने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन या समाजसुधारकांच्या विचारांचा जागर करत अभिवादन करण्यात आले.एसपीएच विद्यालयमालेगाव येथील एस. पी. एच. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. यु. निकम उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एन. जे. निकम उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती सी. एम. साळुंके यांनी तर आभार श्रीमती यु. बी. मेधने यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.आरबीएच कन्या विद्यालय, कॅम्पमालेगाव येथील आर. बी. एच. कन्या विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य सौ. ए. जे. जोंधळे होत्या. यावेळी विद्यालयात आॅनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून प्रथम तीन क्रमांकाची निवड करण्यात आली. यशस्वी विद्यार्थिनींना प्राचार्या सौ. जोंधळे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी आर. जी. पाटील, श्रीमती पवार, पाटील आदिंसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.साठे सार्वजनिक वाचनालय, येवलायेथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक लोणारी होते. प्रारंभी बाळासाहेब लोखंडे, बी. आर. लोंढे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्राचार्य भाऊसाहेब गमे, लक्ष्मण बारहाते, विजय खोकले, सुनिल पैठणकर, सत्येन गुंजाळ, भुषण लाघवे आदी उपस्थित होते.महात्मा गांधी वाचनालय, सटाणासटाणा येथील पालिकेच्या महात्मा गांधी वाचनालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सभापती राहूल पाटील, मोहन सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार, बाळासाहेब देवरे, रामदास सोनवणे, कृष्णा कासार, विवेक देसले उपस्थित होते.
लोकमान्य, लोकशाहीर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 8:43 PM
नाशिक : जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये व सामाजिक संस्थांच्या वतीने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन या समाजसुधारकांच्या विचारांचा जागर करत अभिवादन करण्यात आले.
ठळक मुद्देविचारांचा जागर : जिल्हाभरात विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांमध्ये टिळक पुण्यतिथी, साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम