पाथरे : येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील युवकांनी दरवर्षाप्रमाणे यंदाही स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करून आदर्श उभा केला.
पाथरे बुद्रुक, खुर्द, वारेगाव येथील मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हातात गाडगे, कानात बाळी, फाटके कपडे, हातात झाडू असा पेहराव असणारा आणि सहज, आक्रमक शब्दांत समाजाला अंधश्रद्धा, शिक्षण, पशू-पक्षी बळी, हुंडा, परिसर अस्वच्छता यांसारख्या अनेक सामाजिक विषयांवर ते कीर्तन करीत. मी कोणाचा गुरू नाही आणि माझा कोणी शिष्य नाही, असे म्हणणारे संत गाडगेबाबा हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते, असे मनोगतातून मनोज गवळी, बाळासाहेब कुमावत यांनी व्यक्त केले.यावेळी पाथरे बुद्रुकचे माजी सरपंच भाऊसाहेब नरोडे, माजी सरपंच मच्छिंद्र चिने, माजी सदस्य केशव चिने, वारेगावचे माजी सरपंच मिननाथ माळी, माजी उपसरपंच बाबासाहेब गवळी, माजी सदस्य सोमनाथ घोलप, पाथरे बुद्रुकचे माजी सरपंच शरद नरोडे, संपत चिने, दत्तात्रय सगर, मनोज गवळी, अक्षय गोसावी, पिंटू ढवण, बाळासाहेब कुमावत, चंद्रकांत चिने, राजेंद्र बुब, अमोल दवंगे, शिवाजी गवळी, राजेंद्र बिडवे, जनार्दन चिने, डॉ. योगेश सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.