सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:26 AM2018-11-01T01:26:51+5:302018-11-01T01:27:26+5:30
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंचवटीतील आरपी विद्यालयात बुधवारी (दि. ३१) सरदार पटेल यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी आमदार जयंत जाधव यांच्या हस्ते सरदार पटेलांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
पंचवटी : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंचवटीतील आरपी विद्यालयात बुधवारी (दि. ३१) सरदार पटेल यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी आमदार जयंत जाधव यांच्या हस्ते सरदार पटेलांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात सरदार पटेल यांची जवळपास ६० दुर्मीळ छायाचित्रे मांडण्यात आली होती. यामध्ये सरदार पटेल यांच्या विद्यार्थिदशेपासून ते जन्मघर, कुटुंबातील सदस्य तसेच सत्याग्रह व भारत एकीकरण करताना संस्थानिकांशी संबंधित फोटो या प्रदर्शनात मांडण्यात आलेले होते. याशिवाय आरपी व गोदावरीबाई विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सरदार पटेल यांच्या रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन मांडलेले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पटेलांच्या जीवनावर आधारित समूहगान सादर केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त अनिल मेहता, उर्विश जोशी, गोपाल पटेल मोहन पटेल, अभय चोकसी आदींसह शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन
नाशिक : नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सेवादलाचे प्रभारी मिलिंद कोळी, युवक काँग्रेसचे प्रभारी ब्रिजमोहन दत्त आणि प्रशांत उगले यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. माजी मंत्री शोभा बच्छाव यांनीदेखील इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांच्या कार्याचा उल्लेख केला. सूत्रसंचालन वसंत ठाकूर यांनी केले. बबलू खैरे यांनी आभार मानले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, हेमलता पाटील, वत्सला खैरे, स्वप्निल पाटील, आशा तडवी, आर. आर. पाटील, बबलू खैरे, लक्ष्मण जायभावे, कुसुम चव्हाण आदी उपस्थित होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन
नाशिक : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजपा महानगरतर्फे वसंतस्मृती कार्यालयात अभिवादन करण्यात आले. प्रारंभी विपुल मेहता, नंदकुमार देसाई यांच्या हस्ते पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सरदार पटेल यांच्या जीवन- प्रवासावर मध्य-पश्चिम मंडलाचे अध्यक्ष देवदत्त जोशी यांनी माहिती दिली. यावेळी भारती बागुल, सुजाता करजगीकर, पुष्पा शर्मा, सोनल दगडे, वसंत उशीर आदींचीही यावेळी भाषणे झाली. सूत्रसंचालन देवदत्त जोशी यांनी, तर आभार उदय रत्नपारखी यांनी मानले. यावेळी अरुण शेंदुर्णीकर, शैलेश जुन्नरे, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष माणिकराव देशमुख, शैलेंद्र आजगे, विस्तारक राम बडोदे, मनोज दिवटे, सुखदेव ढिकले, विजय महाले, शिवम शिंपी, विजय कुलकर्णी, नितीन कार्ले, यश जंगम आदी उपस्थित होते.