सिन्नर: अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीच्या माध्यमातून वंचित शोषितांच्या दुःखाला वाचा फोडली. त्यांचे साहित्य लढण्याची प्रेरणा देते असे प्रतिपादन तहसीलदार राहूल कोताडे यांनी केले.तहसील कार्यालयात १००व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना तहसीलदार कोताडे बोलत होते. महाराष्ट्रातील अग्रगण्य सामाजिक संघटना क्रांतीगुरु सोशल फाऊंडेशनच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना संघटनेच्या वतीने पुष्पहार घालण्यात आले. त्यानंतर वावी वेस भागातील अण्णाभाऊ साठे नगर तसेच कुंदेवाडी गाव आणि तहसील कार्यालय व तहसील प्रांगण आदी ठिकाणी अण्णाभाऊंच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. क्रांतीगुरु च्या वतीने विविध शासकीय कार्यालयांना यावेळी अण्णाभाऊंच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गेल्या पंधरा दिवसापासून वाचन करत त्यांना अभिवादन केले.यावेळी तहसीलदार राहुल कोताडे, दत्ता वायचाळे, क्रांतीगुरु सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजुजी कांबळे, प्रदेश कार्याध्यक्ष विजय दोडके, सिन्नर तालुकाध्यक्ष नंदू दोडके, युवा तालुकाध्यक्ष योगेश जाधव, शहराध्यक्ष काळूराम देडे, अनिल साळवे, रविंद्र कांबळे,संजय दोडके, गणेश अस्वरे, साईनाथ अस्वरे, राजुभाऊ वेळकर,लखन खडांगळे,किशोर त्रिभुवन, निलेश जाधव, आशाताई भालेराव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
सिन्नरला अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 3:51 PM
सिन्नर: अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीच्या माध्यमातून वंचित शोषितांच्या दुःखाला वाचा फोडली. त्यांचे साहित्य लढण्याची प्रेरणा देते असे प्रतिपादन तहसीलदार राहूल कोताडे यांनी केले.
ठळक मुद्देशहरात व तालुक्यात विविध ठिकाणी प्रतिमा पूजन