शहरात टिळक, साठे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 08:56 PM2020-08-02T20:56:58+5:302020-08-03T00:40:39+5:30
नाशिक : शहर परिसरात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहर परिसरात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
नाशिकरोड येथील श्रीमती र. ज. चौव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आॅनलाइन गुगल मिटवर साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक संदीप सरोदे होते. प्रारंभी तनिष्का सोनार हिने शाळेची नित्य प्रार्थना सादर केली. साक्षी बुºहाडे या विद्यार्थिनीने टिळक व साठे यांचे काढलेल्या चित्राचे पूजन केले. स्वागत गीत स्वराली देशपांडे हिने सादर केले. लोकमान्य टिळकांची मराठीमधून
प्रिती मेंढे, संस्कृतमधून सानिका ब्राह्मणकर, सायली चौधरी, इंग्रजीतून क्र ांती सरोदे व पीपीटीद्वारे श्रद्धा क्षत्रिय हिने माहिती सादर केली. अण्णा भाऊ साठे यांची माहिती वैभवी सोळसे हिने सादर केली. देवळालीगावात रक्तदान शिबिर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती देवळालीगाव येथे प्रतिमापूजन व रक्तदान करून साजरी करण्यात आली. देवळालीगाव लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर येथे लहुजीनगर मित्रमंडळाच्या वतीने शनिवारी सकाळी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन आमदार सरोज अहिरे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, केशव पोरजे, जगदीश पवार, नगरसेविका सुनीता कोठुळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली. आभार आयोजक नानासाहेब खंडाळे यांनी मानले. यावेळी दिलीप मरसाळे, मनोहर कोरडे, अमोल आल्हाट, चंदू साडे, विक्र म कोठुळे, साहेबराव शृंगार, सूर्यकांत भालेराव, रवींद्र पाटील, सागर निकाळे, किरण राक्षे, अजय लोंढे, वाल्मीक लोंढे, कालिदास चव्हाण, दशरथ सपकाळे, रामचंद्र चव्हाण, योगेश नवगिरे, विजय खंडाळे, किरण चव्हाण आदी उपस्थित होते.