आश्रमशाळेतून धान्याची विक्र ी
By admin | Published: December 31, 2016 01:13 AM2016-12-31T01:13:46+5:302016-12-31T01:14:17+5:30
मानूर : विद्यार्थ्यांची तक्रर; अधीक्षक निलंबित, मुख्याध्यापकाला नोटीस
कळवण : महाराष्ट्र- गुजरात हद्दीजवळील अतिदुर्गम भागातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतून अन्नधान्य खुल्या बाजारात राजरोसपणे विक्र ीसाठी नेले जात असून, या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनीच हा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर कळवण एकात्मिक आदिवासी विकासचे प्रकल्पाधिकारी गंगाथरण डी. यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानूर आश्रमशाळेला तातडीने भेट देऊन पाहणी केली. हा सर्व गैरकारभार ऐकून ते अंचबित झाले. तत्काळ अधीक्षक शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई तर मुख्याध्यापक भामरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कळवण येथील आदिवासी बचाव समिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यास बागलाण तालुक्यातील मानूर शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आश्रमशाळेतील अनागोंदी कारभाराची माहिती दिल्यानंंतर सदर प्रकार उघडकीस आला. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी हा गैरकारभार अन् प्रशासनाकडून होत असलेल्या गैरप्रकाराला वाचा फोडली. याबाबत प्रकल्पाधिकारी गंगाथरण डी. यांच्याकडे निवेदन दिल्याने त्यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन पाहणी केली असता अन्नधान्यात तफावत जाणवली. शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतून अन्नधान्याची होत असलेली चोरी व विक्रीबाबत अधीक्षक शिंदे यांना विद्यार्थ्यांनी जबाबदार धरले असून, सदर घटना पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी बघ्याची भूमिका घ्यावी असा सज्जड दम अधीक्षक शिंदे यांनी दिला होता. तसे न केल्यास दहावीची परीक्षा पास होऊ देणार नाही, अशी धमकी आदिवासी विद्यार्थ्यांना अधीक्षकांकडून दिली गेल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली होती. प्रकल्प अधिकारी गंगाथरण डी. यांनी आश्रमशाळेला भेट देऊन दोन तास विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली व आश्रमशाळेची तपासणी केली. कर्मचारी व विद्यार्थी यांनी दिलेले जबाब यांच्यात विसंगती जाणवली. अधीक्षक शिंदे यांनी अन्नधान्याची होणाऱ्या खुलेआम विक्रीबाबत आरोप फेटाळून लावत विद्यार्थ्यांच्या गैरवर्तणुकीवर आक्षेप घेत तक्र ारीचा पाढा वाचला व विद्यार्थी आपल्यावर खोटा आरोप करीत असल्याचे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले. सटाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक माहिती घेतली .
मानूर येथील आश्रमशाळेतील अन्नधान्याची खुल्या बाजारातील विक्र ीबाबतचा गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर मुख्याध्यापक भामरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून अधिक्षक शिंदेवर निलंबनाची कारवाई केली आहे . तर रोंजदारी वर्ग चारचे तीन कर्मचाऱ्यांचे आदेश रद्द करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली. (वार्ताहर)