किराणा दुकानदारांचा बंद कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:36 AM2021-05-15T00:36:45+5:302021-05-15T00:37:04+5:30

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करीत जिल्हा प्रशासाने वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व दुकाने व व्यावसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात किरकोळ किराणा दुकानदारांना घरपोच सेवा देण्याची सवलत दिली असली, तरी  दुकानाचे शटर उघडताच मनपा प्रशासन व पोलिसांकडून कारवाई होत असल्याने दुकानाचे शटर न उघडता मालाची डिलिव्हरी देणार कशी, असा सवाल उपस्थित करीत नाशिक शहरातील किरकोळ किराणा दुकानदारांनी सलग दुसऱ्या दिवशीही बंदमुळे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. 

Grocery shopkeepers remain closed | किराणा दुकानदारांचा बंद कायम

किराणा दुकानदारांचा बंद कायम

googlenewsNext
ठळक मुद्देअटींमुळे नाराजी : नियम शिथिल करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

नाशिक : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करीत जिल्हा प्रशासाने वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व दुकाने व व्यावसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात किरकोळ किराणा दुकानदारांना घरपोच सेवा देण्याची सवलत दिली असली, तरी  दुकानाचे शटर उघडताच मनपा प्रशासन व पोलिसांकडून कारवाई होत असल्याने दुकानाचे शटर न उघडता मालाची डिलिव्हरी देणार कशी, असा सवाल उपस्थित करीत नाशिक शहरातील किरकोळ किराणा दुकानदारांनी सलग दुसऱ्या दिवशीही बंदमुळे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. 
नाशिक शहरातील किरकोळ दुकानदारांना जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या निर्बंधांतून  शिथिलता देत घरपोच सेवा देण्याची सवलत दिली आहे. 
मात्र, किरकोळ ग्राहकांना अर्धा किलो, पावशेरच्या वजनातील ती ते चार वस्तूंची घरपोच सेवा देण्यासाठी येणारा खर्च वस्तूंच्या एकूण किमतीएवढा अथवा त्याहूनही अधिक येत असल्याने घरपोच सेवा देणे परवडणार कसे, असा सवाल किरकोळ किराणा व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे मनपाचे अधिकारी व पोलिसांकडून दुकानाचे अर्धे शटरही उघडू देत नाहीत. अशा परिस्थिती ग्राहकांनी ऑनलाइन पाठविलेल्या किराणा मालाची यादीची पूर्तता कशी करायची, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. 
त्यामुळे किराणा दुकानदारांनी शुक्रवारीही (दि.१४) सेवा बंद ठेवून प्रशासनाविरोधात निषेध नोंदविला.  त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे मात्र हाल होत आहेत. 

Web Title: Grocery shopkeepers remain closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.