पेठ- पंचायत समितीच्या सभापती पुष्पा गवळी यांच्या पाहणी पथकाने पेठ तालुक्यातील प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्रांना भेटी दिल्या असता बहुतांश कार्यालये कुलूपबंद दिसून आली आहेत. कोहोर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य हेमलता गावीत, सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशिराम वाघमारे, सदस्य विलास अलबाड, पुष्पा पवार आदींनी पेठ तालुक्यात पाहणी दौरा केला. यामध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा देणारे उपकेंद्र बंद अवस्थेत दिसून आले. तर ग्रामपंचायत कार्यालयांना कुलूप आढळून आले. प्राथमिक शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची चाचणी घेतली असता पाचवी ते आठवीच्या मुलांना इंग्रजी विषयावर आधिक उपक्र म राबवण्याची गरज असल्याचे सभापतींनी सांगितले. यावेळी नंदू गवळी, सुरेश पवार, गणेश गवळी आदी उपस्थित होते.
सभापतींच्या पाहणी दौऱ्यात उपकेंद्रासह ग्रामपंचायत कार्यालय कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 2:47 PM