ऊस उत्पादकांचे बॉयलरवर चढून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 06:03 PM2018-10-08T18:03:10+5:302018-10-08T18:04:15+5:30

ऊसाचे पेमेंट कादवा गोदा साखर कारखाना प्रशासन देत नसल्याने निफाड तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी सहा महिन्यांपासून बंद असलेल्या कारखान्याच्या बॉयलरवर चढून आंदोलन केले, मात्र निर्ढावलेल्या प्रशासन आणि संचालक मंडळाने कोणतीही दखल न घेतल्याने शेतक-यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

 Growth of sugarcane growers to boiler | ऊस उत्पादकांचे बॉयलरवर चढून आंदोलन

ऊस उत्पादकांचे बॉयलरवर चढून आंदोलन

Next

निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर पिंपळगाव निपाणी शिवारातील कादवा गोदा साखर कारखान्यात ऊस उत्पादक शेतकºयांचे थकबाकी असलेले शिंगवे येथील शेतकरी रामकृष्ण डेर्ले, किशोर मोगल, सतीश सानप यांनी सकाळी ११ वाजता बॉयलरवर चढून दिवसभर आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांशी शेतकी अधिकारी बडे आणि जनरल मॅनेजर कुरु कुलशिंग यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही काहीही करू शकत नाही. आमच्या हातात काहीही नाही. कार्यकारी संचालक पुणे येथे असल्याने कोणताही निर्णय आम्ही घेऊ शकत नसल्याने आठ दिवसात धनादेश देतो अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दर महिन्याला तारीख देऊन चालढकल करत असल्याने आमचा विश्वास नसल्याने खाली न उतरण्यावर आंदोलनकर्ते शेतकरी ठाम राहिले. निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात सर्वाधिक ऊसाचे उत्पादन घेतले जाते तालुक्यातील निफाड आणि रानवड सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने पिंपळगाव निपाणी येथील केजीएस साखर कारखान्याला शेतकºयांनी ऊस तोडणी करून दिला. फेब्रुवारी, मार्च महिन्यात तोडलेल्या ऊसाचे पैसे कारखाना व्यवस्थापक मंडळाने दिले नाहीत. अनेक शेतकºयांना तारीख पे तारीख देऊन पैसे देणे लांबविले. दुस-या गळीत हंगामाला सुरवात होण्यासाठी काही दिवस बाकी असूनही मागील वर्षाचे जवळपास ३०० शेतक-यांचे अडीच कोटी रु पये थकीत असल्याचे व्यवस्थापकाकडून सांगण्यात येत असले तरी शेतकरी मात्र ३५० शेतक-यांचे ७ कोटी रु पये थकीत असल्याचा दावा करतात, काहीही असले तरी आज जवळपास आठ महिने उलटूनही शेतकºयांना कष्ट करून पिकवलेल्या ऊसाचे दाम मिळत नसल्याने हैराण झाले आहेत.अनेक शेतकरी कर्जबाजारी असल्याने त्यांना खासगी, सरकारी कर्ज देणारे तगादा लावत आहेत, तर काहींना आपला प्रपंचाचा गाडा हाकण्यासाठी पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने वैतागलेल्या शेतकºयांनी काखान्याच्या बॉयलरवर चढून सहा तास आंदोलन केले.

Web Title:  Growth of sugarcane growers to boiler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.