गुरु कुलचे जम्परोप स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 06:54 PM2019-08-11T18:54:11+5:302019-08-11T18:54:51+5:30
येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडिअम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशन वयोगट १२ व १४ या जिल्हा स्पर्धा नाशिक येथील कालिका मंदिर येथे पार पडलेल्या स्पर्धेत गुरुकुलच्या ११ खेळाडूंनी सहभाग नोंदवत तीन सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्य अशा एकूण सात पदकांची कमाई केली आहे.
येवला : तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडिअम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशन वयोगट १२ व १४ या जिल्हा स्पर्धा नाशिक येथील कालिका मंदिर येथे पार पडलेल्या स्पर्धेत गुरुकुलच्या ११ खेळाडूंनी सहभाग नोंदवत तीन सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्य अशा एकूण सात पदकांची कमाई केली आहे.
दिशा महाले (फ्री स्टाइल), करिना चौधरी (३० सेकंद स्पीड), सुनंदा पाडवी (डबल अंडर) या तीन खेळाडूंनी सुवर्णपदकांची कमाई केली. तसेच प्रियंका पवार (३० सेकंद स्पीड), कार्तिक गवळी (थ्री मिनिट्स इंडूरन्स) या दोघांनी रौप्यपदक पटकाविले. ओमकार महाले (३० सेकंद स्पीड), पारस गायकवाड (डबल अंडर) कांस्यपदक पटकाविले.
तसेच अंजना लहरे, धीरज चव्हाण, ऋतिक कोल्हे, विक्रम परालंके या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. यशस्वी खेळाडूंना गुरु कुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे, उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, प्राचार्य राजेश पाटील, संकुलप्रमुख प्रकाश भांबरे, प्रमोद शेलार, तेजस राऊत, अमोल आहेर, प्रवीण घोगरे, योगेश गांगुर्डे, ऋतिक भाबड आदींनी या खेळाडूंचा सत्कार केला.