गुरुपायी ठेविता भाव...शिक्षकांप्रति कृतज्ञता ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 10:47 PM2020-09-05T22:47:39+5:302020-09-06T01:00:34+5:30
ंमालेगाव : जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालयांत शिक्षकदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शारीरिक अंतर राखण्यात येऊन विविध उपक्रम राबविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालयांत शिक्षकदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शारीरिक अंतर राखण्यात येऊन विविध उपक्रम राबविण्यात आले.
केबीएच विद्यालय, मालेगाव कॅम्प
येथील कॅम्पातील केकेबीएच विद्यालयात अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पवार होते. यावेळी उपप्राचार्य सुनील बागुल, उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक विलास पगार, पर्यवेक्षक संतोष सावंत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आॅनलाइन वक्तृत्व स्पर्धेतील दोन विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकवण्यात आले. शिक्षिका श्रीमती पी. एच. वाघ यांनी विद्यालयास ग्रंथ भेट दिले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आर. डी. शेवाळे यांनी केले. आभार आर. एम. धनवट यांनी मानले.
केबीएच विद्यालय
मालेगाव : येथील केबीएच विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल पवार होते. यावेळी उपप्राचार्य सुनील बागुल, उपप्राचार्य रवींद्र शिरुडे, पर्यवेक्षक विलास पगार, पर्यवेक्षक संतोष सावंत व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. आर. एम. धनवट जे. टी. ठाकरे, शशिकांत पवार, एस.के. सूर्यवंशी, ए.के. खेडकर, नितीन पवार, वामन शिंदे, जे. एस. कन्नोर, संजय सूर्यवंशी, पांडुरंग शेलार उपस्थित होते.
नेहरू विद्यालय, पाटणे
मालेगाव : तालुक्यातील पाटणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे.टी. शेवाळे होते. प्रास्ताविक के.बी. धनेश्वर यांनी केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शेवाळे यांनी केले. यावेळी आर. एस. अहिरे, आर.पी. महाजन उपस्थित होते. आभार बी. एस. महाजन यांनी मानले.
जनता विद्यालय, सौंदाणे
पाटणे : मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकदिन साजरा झाला. वाय. आर. पवार, उपप्राचार्य के. डी. दाभाडे, पर्यवेक्षक एस. डी. वाघ यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पवार यांनी प्रतिमापूजन केले. सूत्रसंचालन पी. यू. जाधव यांनी
केले.
वैनतेय विद्यालय
निफाड : येथील वैनतेय विद्यालयात प्राचार्य डी. बी. वाघ व विद्यालयाचे उपप्राचार्य एस. पी. गोरवे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डी.बी. वाघ, उपप्राचार्य एस.पी. गोरवे यांची भाषणे झाली. याप्रसंगी एस. पी. गोरवे, बी. आर. सोनवणे, सुभाष खाटेकर, आर. एम. लाहोटी, ए. बी. बनसोडे उपस्थित होते.
आश्रमशाळा, पांडाणे
पांडाणे : प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, पांडाणे येथे शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक गिरीश पाटील यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमात ज्या ज्या शिक्षकांनी वाड्यावस्त्यावर जाऊन अनलॉक लर्निंग उपक्रमांतर्गत ज्ञानदान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत, अशा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
ा्रास्ताविक वसंत देसले यांनी केले तर शरद शिवदे यांनी आभार मानले.गीताई वाघ
कन्या विद्यालय
भाऊसाहेबनगर : येथील गीताई वाघ कन्या विद्यालय येथे आॅनलाइन शिक्षकदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जयश्री पानगव्हाणे होत्या. यावेळी साक्षी शिरसाठ, गौरी जाधव, जानकी सुरवाडे, स्नेहा हांडगे, समृद्धी सातभाई या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर पर्यवेक्षक धिवर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल माहिती दिली. रोशनी कडाळे हिने आभार मानले.एसपीएच विद्यालय, मालेगाव
मालेगाव : एसपीएच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी राष्टÑपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष निकम होते. व्यासपीठावर पयर्वेक्षक एन.जे. निकम उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील कोकणी यांनी केले. आभार सोपान पाटील यांनी मानले. एलव्हीएच विद्यालय
मालेगाव : येथील एलव्हीएच विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षकदिन साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिनेश पवार होते. त्यांच्या हस्ते राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पी. पी. राजपूत, मुख्याध्यापक पवार यांनी मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक एम. पी. शिंदे, प्रकाश कचवे, ज्ञानदेव हिरे, मगन शिरोळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. सूर्यवंशी यांनी केले व आभार गिरीश पवार यांनी मानले.विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शिक्षकदिन
जानोरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात कोरोनामुळे साध्या पद्धतीने व विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शिक्षकदिन साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राजकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शंकर वाघ, सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, शंकर काठे, पोलीसपाटील सुरेश घुमरे, अशोक केंग, योगेश तिडके, संपत घुमरे, मुख्याध्यापक हडस व शिक्षक उपस्थित होते.