एचएएल कामगारांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात केन्दीय संरक्षण मंत्र्यांची भेट घेणार : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:45 PM2019-10-18T23:45:10+5:302019-10-18T23:46:36+5:30
ओझरटाऊनशीप : देशाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या कामगारांना सरकारला न्याय देता येत नाही, ही बाब दुर्दैवी असुन देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र ेकाम करणाºया एच ए एल कामगारांनी कधीही इतकी टोकाची भुमिका या पुर्वी घेतली नव्हती सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे.
ओझरटाऊनशीप : देशाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या कामगारांना सरकारला न्याय देता येत नाही, ही बाब दुर्दैवी असुन देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र ेकाम करणाºया एच ए एल कामगारांनी कधीही इतकी टोकाची भुमिका या पुर्वी घेतली नव्हती सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. निवडणुका झाल्यानंतर देशभरातील एच ए एल कामगार संघटनांच्या निवडक प्रतिनिधीसह आपण स्वत: केंद्रीय संरक्षणमंत्री यांची भेट घेऊन कामगारांचा वेतनकरारवाढीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपकरी कामगारांना दिली.
वेतन करारवाढी एच ए एल कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पाचव्या दिवशी शरद पवार यांनी संपकरी कामगारांशी संवाद साधला.
यावेळी पवार यांनी सांगितले की चीनच्या युद्धानंतर देशाची संरक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी एच ए एल कारखान्याची निर्मिती केली. देशाची संरक्षणाची गरज भागवून जगाला अन्य गोष्टी तयार करून पुरवण्याचे काम देखील तत्कालीन सरकारने केले होते.
एच ए एल ने सुखोई विमानाचे काम यशस्वी केल्या नंतर भारतीय वायुसेनेच्या कामगिरीत सुखोईची भुमिका महत्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने फ्रांन्स कडुन राफेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला राफेल चांगले पण सुखोई सरसच असल्याचे सांगत ज्यांना कागदी विमान बनवता येत नाही त्यांना सरकारने विमान बनवण्याचे काम दिले असा टोला त्यांनी लगावला. देशाची सेवा करणा-या कामगारांना सरकारला न्याय देता नाही केंद्र सरकारने अनुकूल निर्णय न घेतल्यानेच आज उद्योग क्षेत्राची अवस्था वाईट झाल्याचा आरोप करून आपन संरक्षणमंत्री असतांना एच ए एल ला किती वर्षे काम मिळेल, याचा अभ्यास करूनच विमान उत्पादनाची क्षमता असलेल्या एच ए एल ला काम दिल्याचे सांगितले.
गेल्या काही वर्षात एच ए एल सह उद्योग क्षेत्रात कामगारांची संख्या सातत्याने कमी होतीय, परंतु अधिकाऱ्यांची संख्या वाढतीय हे अनुकूल नसल्याचे सांगत एच ए एल कामगारांची मागणी रास्त असुन यासाठी विधानसभा निवडणुकीनंतर आपण व्यक्तीश: यात लक्ष घालणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी कामगार नेते रामू जाधव, कामगार संघटनेचे अध्यक्ष भानुदास शेळके यांनी आपल्या भाषणातून संपकरी कामगारांच्या भावना व्यक्त केल्या.
या वेळी माजी आमदार दिलीप बनकर, सरचिटणीस सचिन ढोमसे, माजी सरपंच राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.