एच ए एल कामगारांचा संप सातव्या दिवशी सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 07:06 PM2019-10-20T19:06:24+5:302019-10-20T19:06:49+5:30
ओझरटाऊनशिप : सोमवार पासुन शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या एच ए एल कामगारांच्या बेमुदत संपाच्या आज सातव्या दिवशी भर पावसात ही संपकरी कामगार एच ए एल च्या प्रवेशद्वारा ठिय्या देऊन घोषणाबाजी करत होते.
ओझरटाऊनशिप : सोमवार पासुन शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या एच ए एल कामगारांच्या बेमुदत संपाच्या आज सातव्या दिवशी भर पावसात ही संपकरी कामगार एच ए एल च्या प्रवेशद्वारा ठिय्या देऊन घोषणाबाजी करत होते.
१ जानेवारीपासुन प्रलंबीत असलेला वेतन करारासह इतर मागण्यासाठी अखिल भारतातील एच ए एलच्या ९ विभागातील २० हजार कर्मचारी सोमवार पासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामध्ये नाशिक विभागातील ३५०० कर्मचारी ही सहभागी झाले आहेत.
सोमवार पासून एच ए एल कर्मचाऱ्यांचा संप सुरू असुन रोज सकाळी एच ए एल च्या प्रवेशद्वारावर सर्व कर्मचारी एकत्रीत जमा होऊन ठिय्या देत दिवसभर घोषणाबाजी केली जात आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविारी सातव्या दिवशी भर पावसात कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत दिवसभर घोषणाबाजी केली. त्याच बरोबर तिनही प्रवेशद्वारावर कामगारांनी १२ ते १५ या संख्येने एकत्रीतपणे थांबुन कोणी ही कर्मचारी किंवा कंत्राटीकामगार कारखान्यात जाणार नाही याची ते काळजी घेत होते.
एच ए एल कामगारांचा गेल्या सहा दिवसापासुन बेमुदत संप सुरु आहे. या सर्व कामगारासाठी अल्पोपहाराची व्यवस्था रोज कारखान्यातील वेगवेगळ्या शाँप मधील कामगारातर्फे केली जात आहे. संप सुरू राहील त्या दिवस अखेर पर्यंत याच रोटेशन प्रमाणे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे कामगारांनी सांगितले.
कारखान्यात असलेले जवळपास १५०० अधिकारी कामावर जाताना एकित्रतपणे कारखान्यात जातात व त्याच प्रमाणे बाहेर येतात त्यावेळी प्रवेशद्वारावर कामगारांची जोरदार घोषणा बाजी सुरूअसते.