लासलगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे लासलगावचे सहाय्यक अभियंता सोनवणे यांनी लासलगाव शहर व परिसरातील खेडेगावात विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर बेपर्वाई दाखवित विज ग्राहकांना वेठीस धरीत जनतेला तीन दिवस अंधारात ठेवल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.शुक्र वारी दुपारी लासलगाव व परिसरात जोरदार वादळ झाले परिणामी अनेक ठिकाणी नुकसान पाहायला मिळाले.यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे साईबाबा मंदिरासमोरील रोहित्र देखील जमीनदोस्त झाले. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून निम्मे लासलगाव शहर अंधारात बुडाले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सोनवणे हे फोनच उचलत नव्हते.त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे नेते संतप्त झाले असुन येत्या दोन दिवसात अचानक आंदोलन होण्याची शक्यता आहे. वीज खंडीत झाल्याने नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या तीन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण आहे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून चौकशी केली असता त्यांचे फोन लागत नाही अशा तक्र ारी आहेत.सहाय्यक अभियंता सोनवणे हे तर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना नेमकी कुणाकडे तक्र ार करायची असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे.मात्र शहर अभियंता चव्हाण हे गेल्या तीन दिवसापासून कर्मचार्यां समावेत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करित आहेत. मात्र त्यांना जोडी सहाय्यक अभियंता सोनवणे हे देखील त्याठिकाणी आले असते तर गेले तीन दिवसापासून लासलगाव करांना अंधारात राहण्याची वेळ आली नसती अशी चर्चा या निमित्ताने शहरात सुरू झाली आहे.
निम्मे लासलगाव तीन दिवसांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 1:21 AM
लासलगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे लासलगावचे सहाय्यक अभियंता सोनवणे यांनी लासलगाव शहर व परिसरातील खेडेगावात विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर बेपर्वाई दाखवित विज ग्राहकांना वेठीस धरीत जनतेला तीन दिवस अंधारात ठेवल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
ठळक मुद्देनेमकी कुणाकडे तक्र ार करायची असा प्रश्न