पेठला अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 04:17 PM2019-12-05T16:17:18+5:302019-12-05T16:17:29+5:30

पेठ - शहरातील अतिक्र मणाचा विळखा मोकळा करण्यासाठी पेठ नगरपंचायतीच्या वतीने राबवण्यात येणारी धडक मोहीम दुसर्या दिवशीही राबवण्यात आली. ...

 Hammer on Peth's encroachments | पेठला अतिक्रमणांवर हातोडा

पेठला अतिक्रमणांवर हातोडा

Next

पेठ - शहरातील अतिक्र मणाचा विळखा मोकळा करण्यासाठी पेठ नगरपंचायतीच्या वतीने राबवण्यात येणारी धडक मोहीम दुसर्या दिवशीही राबवण्यात आली. गुरूवारी सकाळी नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्र मण विभागाच्या वाहनांचा ताफा हुतात्मा स्मारक परिसरात धडकला. अतिक्र मण धारकांना आधीच कुणकुण लागल्याने हातोडा पडण्यापुर्वीच सामानाची आवरा सावर सुरू करण्यात आली होती. तर काहींनी स्वत:हून अतिक्र मण काढून घेण्याच्या अटीवर सुट देण्यात आली. दुपारी तहसील कार्यालय वसाहती जव.ळचे अतिक्र मण हटवण्यात आले. याप्रसंगी बघ्यांची मोठया प्रमाणावर गर्दी झाल्याने काही काळ बलसाड रस्त्यावर वाहतूकीचा प्रश्न निर्माण झाला होता . दुपारनंतर पोस्ट कार्यालयाजवळ राहिलेले अतिक्र मण काढण्यात आले.
-------------------
शासकिय इमारतींना विळखा
पेठ शहरात तहसील कार्यालय, पंचायत समतिी व जिल्हा परिषद मालकीच्या विविध इमारती असून अनेक वर्षापासून या ईमारती धुळ खात पडल्या असल्याने या ठिकाणी अतिक्र मणाचा मोठ्या प्रमाणावर विळखा बसला असून संबंधित विभागाने अशा ईमारती जमीन दोस्त करून संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title:  Hammer on Peth's encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक