पाथरे येथे ‘एक मूठ’ पोषण आहार अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:13 PM2020-10-14T22:13:49+5:302020-10-15T01:36:46+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील पाथरे येथे पाथरे खुर्द, वारेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून ह्यएक मूठ पोषणह्ण या पोषण आहार अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच बाळासाहेब खळदकर, माजी सदस्य नारायण सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
पाथरे : सिन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील पाथरे येथे पाथरे खुर्द, वारेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून ह्यएक मूठ पोषणह्ण या पोषण आहार अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच बाळासाहेब खळदकर, माजी सदस्य नारायण सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर ग्रामपंचायत प्रशासक संध्या देशमुख, अंगणवाडी पयर्वेक्षिका सुशिला बढे, ग्रामसेवक नितीन मेहरखांब, ग्रामपरिवर्तक अमोल कुकडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. एक मूठ पोषण हा कार्यक्रम माता आणि बालकांच्या पोषणावर लक्ष केंद्रित करून कुपोषणाचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी आयोजित करण्यात आला. वारेगाव येथील अंगणवाडी येथे कुपोषण निर्मूलनासाठी कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर सर्व नियमांचे पालन करून पाथरे खुर्द, कदम वस्ती, दिघे वस्ती, वारेगाव, चिने वस्ती येथीलअंगणवाडीतील कुपोषित जवळपास चाळीस मुलांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. एक मूठ पोषण आहार अभियानांतर्गत मध्यम व तीव्र वजन गटातील बालक, मध्यम व तीव्र कुपोषित श्रेणीतील बालक, गरोदर माता यांच्यासाठी रोज पाच मिली खोबरेल तेल,गुळ, शेंगदाणे, बटाटा, खजूर आदी पोषक आहार ग्रामपंचायतच्या सहभागाने देण्यात आले. यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनही प्रातिनिधिक स्वरूपात वाटण्यात आले. पाथरे विभागासाठी ५७५ सॅनिटरी नॅपकिनचे वाटप किशोरवयीन मुलींना करण्यात येणार आहे. याप्रसंगी मीना पगारे, उज्ज्वला डोंगरे, प्रभावती शेरे, आशा सोमवंशी, सुषमा गवळी, मीना घुमरे, मंदा कदम, सपना सोमवंशी, अनिता गुंजाळ, मंदा पाचोरे, सुशिला कदम, ग्रामपंचायत कमर्चारी सुभाष गुंजाळ, पांडुरंग चिने आदींसह माता, बालक, किशोरवयीन मुली उपस्थित होत्या.