अभोण्यात हनुमान रु ग्णसेवा केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 04:58 PM2018-10-21T16:58:56+5:302018-10-21T16:59:08+5:30

अभोणा : विविध समाजोपयोगी उपक्र मातून समाजभान जोपासणाऱ्या येथील हनुमान गणेश मित्रमंडळाने या वर्षापासून रु ग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून शहर परिसरातील गरजू, गरीब रु ग्णांसाठी विनामूल्य रु ग्णोपयोगी वस्तूंची सेवा उपलब्ध करून देत एक पाऊल पुढे टाकले आहे.

 Hanuman Ru Gunaseva Center in Abhode started | अभोण्यात हनुमान रु ग्णसेवा केंद्र सुरू

अभोण्यात हनुमान रु ग्णसेवा केंद्र सुरू

Next
ठळक मुद्देहनुमान गणेश मित्रमंडळाने यंदा गरजू रु ग्णांसाठी हनुमान रु ग्ण सेवा केंद्राच्या माध्यमातून कमोड खुर्ची, वॉकर, यूरिन पॉट, हवेची गादी, व्हील खुर्ची, पलंग, स्ट्रेचर, आॅक्सिजन सिलिंडर आदी वस्तू विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत.


अभोणा : विविध समाजोपयोगी उपक्र मातून समाजभान जोपासणाऱ्या येथील हनुमान गणेश मित्रमंडळाने या वर्षापासून रु ग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून शहर परिसरातील गरजू, गरीब रु ग्णांसाठी विनामूल्य रु ग्णोपयोगी वस्तूंची सेवा उपलब्ध करून देत एक पाऊल पुढे टाकले आहे.
या उपक्र माचा शुभारंभ अभोणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते, रंगनाथ वेढणे, दिनकर आहेरराव, रत्नाकर जगताप, कमलाकर कामळस्कर, अशोक मुठे, रामदास कामळस्कर, धर्मेंद्र शहा, वैभव मुठे, शिरीष शहा आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल वेढणे, वासुदेव मुसळे, सचिन मुठे, नीलेश मुसळे, प्रभाकर आहेरराव, विजय देसाई, संदीप शहा, किरण शहा, भूषण वेढणे, गणेश मुसळे, धीरज देशमुख, शंकर मुसळे, योगेश वेढणे यांच्यासह मंडळाचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.  
 

Web Title:  Hanuman Ru Gunaseva Center in Abhode started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.