नांदूरवैद्य येथे हरिनाम सप्ताहास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 08:59 PM2021-01-18T20:59:18+5:302021-01-19T01:30:28+5:30
नांदूरवैद्य : येथील मारूती मंदिरात नामवंत कीर्तनकारांच्या प्रमुख उपस्थितीत ४५व्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता प्रभाकर मुसळे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नांदूरवैद्य : येथील मारूती मंदिरात नामवंत कीर्तनकारांच्या प्रमुख उपस्थितीत ४५व्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता प्रभाकर मुसळे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर वीणा पूजन करण्यात आले.
सप्ताहामध्ये काकडा भजन, निवृत्तिनाथ महाराज सामुदायिक गाथा पारायण, जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा भजन, पारायण, महिला भजन, प्रवचन, स्वाध्याय, परिपाठ व त्यानंतर रात्री कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. या सप्ताहामध्ये सकाळच्या सत्रात होणारे संत निवृत्तिनाथ महाराज गाथा पारायण ज्ञानेश्वरी व तुकाराम महाराज गाथा व्यासपीठ कंठस्थ असणारे मनोहर महाराज सायखेडे व अतुल महाराज तांबे सातही दिवस सांभाळणार आहेत.
या सप्ताहामध्ये मठाधिपती माधव घुले, नामदेव डोळस, मनोहर सायखेडे, माधव काजळे, एकनाथ गोळेसर, जयंत गोसावी, जगदीश जोशी आदींचे कीर्तन होणार आहे. याप्रसंगी प्रभाकर मुसळे, सोपान मुसळे, रामदास यंदे, संतोष डोळस, सखाहारी काजळे, राजाराम मुसळे, किसन यंदे, मोहन धोंगडे, शिवाजी मुसळे, माधव काजळे, दत्तात्रय दिवटे आदींसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
(१८ नांदूरवैद्य २)