हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:19 AM2021-08-19T04:19:51+5:302021-08-19T04:19:51+5:30

जिल्ह्यातील हॉटेल्स - १०,००० सध्या सुरू झालेले हॉटेल्स - ८७०० हॉटेल कर्मचाऱ्यांची संख्या - ४०,००० चौकट- काहींचे लसीकरण ...

Has the vaccination of hotel staff been completed, brother? | हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का भाऊ?

हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का भाऊ?

Next

जिल्ह्यातील हॉटेल्स - १०,०००

सध्या सुरू झालेले हॉटेल्स - ८७००

हॉटेल कर्मचाऱ्यांची संख्या - ४०,०००

चौकट-

काहींचे लसीकरण पूर्ण, काहींचे बाकी !

नांदुरनाका परिसर

नांदुरनाका परिसरातील एका हॉटेलला भेट दिली असता तेथील दोन ते तीन कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नसल्याचे समोर आले या कर्मचाऱ्यांनी दोनवेळा लस घेण्याचा प्रयत्न केला; मात्र लसीची संख्या कमी असल्यामुळे दोन्हीही वेळा त्यांना लस न घेताच परतावे लागले. आता पुन्हा प्रयत्न करणार असल्याचे एक कर्मचारी म्हणाला.

पाथर्डीफाटा परिसर

पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या एका हॉटेलला भेट दिली असता, तेथील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे दिसून आले. ४ वाजेपर्यंतची वेळ असतानाच लसीकरण आणि कोरोना चाचणी करण्याचे बंधन असल्यामुळे आमच्या मालकांनी सर्व स्टाफचे त्याचवेळी लसीकरण केले आहे. दोन ते तीन कर्मचाऱ्यांचे दोन्हीही डोस पूर्ण झाले आहे तर बाकीच्यांचा एक डोस पूर्ण झाला आहे.

चौकट-

रस्त्यांवर टपऱ्यांवर आनंदी आनंद

शहरातील चौकाचौकात चहा आणि वडापाव विक्रीच्या हातगाड्या आहेत. या गाड्यांवर काही ठिकाणी तर लहान मुलंही काम करताना दिसून येतात. लहान मुलांना अद्याप लस दिली जात नसल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नच आहे. काही ठिकाणी तर अद्याप मालकांनीच लस घेतली नसल्याचेही दिसून आले. काही गाड्यांवर कामाला असलेल्या १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे दिसून आले.

चौकट-

कोट-

४ वाजेपर्यंतची वेळ असतानाच हॉटेलचालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आणि लसीकरण करून घेतले आहे. तसे बंधनच घालण्यात आले असल्याने ते करणे गरजेचे आहे. ज्या मालकांचे कर्मचारी बाहेरगावी गेलेले आहेत त्यांनी त्यांच्या गावात जरी लसीकरण केले असेल तर ते ग्राह्य धरले जाणार असल्याने बहुसंख्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. - संजय चव्हाण, अध्यक्ष बार ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन

चौकट-

मागील दोन-तीन दिवसांपासूनच शहरातील हॉटेल्स १० वाजेपर्यंत सुरू झाली आहेत. तेथील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी विशेष पथकांची तपासणी करण्यात येणार असून, यासंबंधीचे पत्र लवकरच संबंधिताना देण्यात येणार आहे. पथकातील कर्मचारी हॉटेल्सला भेटी देऊन लसीकरणाबाबतची खातरजमा करणार आहेत.

- डॉ. आवेश पलोड, कोरोना सेलप्रमुख, महापालिका, नाशिक

Web Title: Has the vaccination of hotel staff been completed, brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.