टाकेद उपकेंद्रात आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 06:59 PM2021-01-13T18:59:29+5:302021-01-13T19:00:35+5:30
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील आरोग्य उपकेंद्रात परिसरातील नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला. वैद्यकिय अधिकारी डॉ. भारती फुले यांच्या उपस्थितीत हे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.

ग्रामीण भागात एन. सी. डी. कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, खेडच्या वतीने सर्व सामान्य नागरिक, गरोदर महिला, जेष्ठ नागरिक, मुलांच्या आरोग्य तपासण्याकरून त्यांच्यावर मोफत ओषधोपचार करण्यात आले. या शिबिरात कोविड १९ च्या २६ व्यक्तिंच्या ॲटिजेंट कोविड तपासण्या करण्यात आल्या व त्या सर्व निगेटिव्ह आल्या.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख व खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज गुप्ता यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या शिबिरात सुमारे ६५ रूग्णांनी तपासण्या करून घेतल्या. सदरचे शिबीर प्रत्येक बुधवारी घेण्यात येणार असून याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. या वेळी आरोग्यसेवक अमोल पाटील, गट परिवर्तक गीता बोराडे, भारती सोनवणे, तानाजी पावशे, दत्ता देशमुख, हेमंत सुर्यवंशी, सुनिता धादवड, विजया बांबळे आदी उपस्थित होते.