पिंपळगावी चालक दिनानिमित्त वाहनचालकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:14 AM2021-09-19T04:14:44+5:302021-09-19T04:14:44+5:30
अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, ठाणे येथील महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाचे पोलीस अधीक्षक प्रधान, नाशिकचे पोलीस उपअधीक्षक ...
अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, ठाणे येथील महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाचे पोलीस अधीक्षक प्रधान, नाशिकचे पोलीस उपअधीक्षक शांताराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली चालक दिन साजरा करण्यात आला. पिंपळगाव बाजार समितीच्या आवारात आयोजित कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार दिलीप बनकर, पोलीस उपअधीक्षक वळवी, पोलीस निरीक्षक बच्छाव, न्यू इंडिया असोसिएशनचे चेअरमन कालरा, मोटार मालक कामगार वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जाधव उपस्थित होते.
वाहन चालविताना चालकांनी डोळ्यांचे आरोग्य जपणे फार गरजेचे असल्याचे सांगून बनकर म्हणाले, देशाच्या प्रगतीत चालकांचे योगदान मोलाचे आहे. कारण दळणवळणाशिवाय सर्व ठप्प होऊ शकते असे बनकर म्हणाले. पिंपळगाव महामार्ग मदत केंद्रातर्फे वाहनचालकांसाठी आयोजित आरोग्य शिबिरात ७० ते ८० चालकांची नेत्र, दातांची तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली. यावेळी आमदार बनकर यांच्या हस्ते चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, पिंपळगाव महामार्ग मदत केंद्राचे अधिकारी व कर्मचारी तसेच डॉ. डहाळे सन्मती आय हॉस्पिटल सुपरस्पेशालिटी सेंटरचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - १७ पिंपळगाव१ पिंपळगाव बाजार समितीत चालकांचा सत्कार करताना आमदार दिलीप बनकर. समवेत पोलीस निरीक्षक बच्छाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सचिन जाधव आदी.
170921\453817nsk_52_17092021_13.jpg
पिंपळगाव बाजार समितीत चालकांचा सत्कार करतांना आमदार दिलीप बनकर. समवेत पोलिस निरीक्षक बच्छाव, सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सचिन जाधव आदी.