मालेगावी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
By admin | Published: August 29, 2016 11:45 PM2016-08-29T23:45:09+5:302016-08-30T00:31:14+5:30
महापालिका : मोहिमेचा शुभारंभ; ७५० विद्यार्थ्यांची तपासणी
आझादनगर : मालेगाव महानगरपालिका, मनपा शिक्षण मंडळ व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ आज शाळा क्र. १ मध्ये करण्यात आला. २९ आॅगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत मोहीम सुरू राहणार आहे.
विद्यार्थ्यांची आरोग्य व डोळे तपासणी करण्यात येणार आहे. आज सुमारे ७५० विद्यार्थ्यांची आरोग्य व डोळे तपासणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महापौर हाजी मोहंमद इब्राहीम होते. व्यासपीठावर आयुक्त दिलीप स्वामी, उपमहापौर शेख युनूस इसा, प्रशानाधिकारी राजेंद्र सोनवणे, डॉ. निमा सूर्यवंशी उपस्थित होते.
शहरात मलेरिया, अतिसार, हिवतापची साथ सुरू आहे. यामुळे शहरातील लहान-मोठे रुग्णालयात गर्दीचे प्रमाण वाढले आहे. गत महिन्यात शहरात बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाल्याची नोंद बडा कब्रस्तानात दाखल आहे. याची गंभीर दखल घेत मनपाचे प्रभारी आयुक्त दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधिताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
यावेळी आयुक्त दिलीप स्वामी यांनी मार्गदर्शन केले. महापौर हाजी मोहंमद इब्राहीम, उपमहापौर युनूस ईसा यांची भाषणे झाली. प्रास्ताविक शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी राजेंद्र सोनवणे यांनी केले. आभार आरोग्य अधिकारी किशोर डांगे यांनी मानले. (वार्ताहर)