गुळवंचला ६५० कुटुंबांना आरोग्यपूरक साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:17 AM2021-06-09T04:17:05+5:302021-06-09T04:17:05+5:30
सिन्नर: गुळवंच येथील श्रीराम मंदिर रामचंद्र देवस्थान संस्थान व दत्तसाई मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक आरोग्यदायी उपक्रमांतर्गत ...
सिन्नर: गुळवंच येथील श्रीराम मंदिर रामचंद्र देवस्थान संस्थान व दत्तसाई मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक आरोग्यदायी उपक्रमांतर्गत ६५० कुटुंबांना आरोग्यपूरक साहित्य वाटप करण्यात आले.
दत्तसाई मंदिर, विठ्ठल मंदिर परिसर, दगडवाडी व अहिल्यानगर या ठिकाणी जाऊन दोन्ही संस्थांच्या सभासदांच्या हस्ते गावातील ६५० कुटुंबांना सॅनिटायझर, मास्क, हॅडवॉश, साबण, वाफेच्या गोळ्या आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी दत्तसाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष त्र्यंबक ताडगे, रामचंद्र देवस्थानचे अध्यक्ष भगवान सानप, संचालक व तरुण उपस्थित होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आजार बळावलेला दिसून आला. गुळवंचसारख्या गावात आणि परिसरातही रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन पावले उचलून कोरोना आटोक्यात आणला आहे. हीच स्थिती यापुढच्या काळातही कायम राहावी यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे भगवान सानप यांनी सांगितले. श्रीदत्त मंदिर ट्रस्ट व रामचंद्र देवस्थान यांनी जबाबदारी ओळखून परिसरातील कुटुंबांना कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही करण्यात आली.
-------------------
गुळवंच ग्रामस्थांना आरोग्यपूरक साहित्य वाटप करताना त्र्यंबक ताडगे, भगवान सानप आदींसह पदाधिकारी. (०७ सिन्नर २)
===Photopath===
070621\07nsk_7_07062021_13.jpg
===Caption===
०७ सिन्नर २